Maratha Kranti Morcha : परभणी - राज्य परिवहन महामंडळाचा २२ लाखांचा महसूल बुडाला 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

परभणी - राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातील ४४७ पैकी एकही बस गुरूवारी (ता.९) आगाराबाहेर पडलेली नाही. परिणामी, २२ लाखांचा महसूल बुडाला असून प्रशासकीय कामकाज वगळता चालक आणि वाहक मिळून दीड हजार कर्मचारी बसून आहेत. 

परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील सात आगार प्रमुखांना बुधवारी (ता.८) रात्री बसेस बंद ठेवण्याचा निरोप देण्यात आला होता. म्हणून पाहाटे पाच वाजल्यापासून बसेस सोडण्यात आलेल्या नाहीत. परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी तर हिंगोलीतील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली बसस्थानकात शुकशुकाट पाहवयास मिळाला. दोन्ही जिल्ह्यातील बसेसचा चक्का जाम राहिल्यामुळे एक हजार ७०० फे-या केल्या असून दोन हजार ५०० किलो मीटर बसेस धावणारही नाहीत. 

Web Title: #maharahtrabandh maratha kranti morcha State Transport Corporation's revenue of 22 lakhs lost