Maratha Kranti Morcha: बीड जिल्ह्यात रस्त्यावरच मुंडन आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

चक्काजाम आंदोलन सुरु असले तरी आंदोलकांनी रुग्णवाहिकांना तत्काळ रस्ताही करुन दिला. लोकशाही पद्धतीने सुरु असलेल्या आंदोलनात हिरापूर व वडवणी येथे रस्त्यावरच मुंडन आंदोलन करण्यात आले.

बीड : गुरुवारी पुकारलेल्या बंदमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर मुंडन आंदोलन केले. हिरापूर (ता. गेवराई) व वडवणी येथे सामुदायिक मुंडन करुन शासनाचा निषेध करण्यात आला.

गुरुवारी (ता. नऊ) जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत असून जागोजागी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. टायर जाळल्याच्या घटना वगळता कुठेही हिंसक घटनेची नोंद नाही.

चक्काजाम आंदोलन सुरु असले तरी आंदोलकांनी रुग्णवाहिकांना तत्काळ रस्ताही करुन दिला. लोकशाही पद्धतीने सुरु असलेल्या आंदोलनात हिरापूर व वडवणी येथे रस्त्यावरच मुंडन आंदोलन करण्यात आले.

Web Title: Maharashtra Bandh agitaiton in Beed Maratha Kranti Morcha