Maratha Kranti Morcha 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'

सुशांत सांगवे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

लातूर : 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा देत तर कुठे चौकात टायर जाळत, वेगवेगळ्या भागात दुचाकी रॅली काढत तर कुठे ठिय्या आंदोलन करत मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाकडे लक्ष वेधून घेतले.

मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी लातूर बंदला सुरुवात झाली. प्रमुख रस्त्यांवर टायर पेटवून शहरात येणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. या आंदोलनात तरुणाई मोठया संख्येने सहभागी झाली आहे. आम्हाला आरक्षण कशी मिळणार, अशा घोषणा देताना ती दिसत आहे.

दरम्यान, शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरले आहेत.

Web Title: #Maharashtra Bandh latur maratha agitation