फुलंब्री नगरपंचायतीत महाराष्ट्र दिन उत्साहात

नवनाथ इधाटे
बुधवार, 2 मे 2018

सुरवातीला पानवाडी व फुलंब्रीच्या महसुली हद्दीचा वाद असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकला नाही. शेवटी शासनानेच फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात अध्यादेश काढून निवडून प्रोग्रॅम जाहीर केला आणि डिसेंबर 2017 मध्ये ही निवडणूक घेण्यात आली.

फुलंब्री - येथील नगरपंचायत कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त प्रथम उपनगराध्यक्षा इंदूबाई मिसाळ यांच्या हस्ते मंगळवारी (ता. 1) ला सकाळी 7 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, मुख्याधिकारी योगेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

फुलंब्री येथील सुरवातीला ग्रामपंचायत कार्यरत होती. मात्र लोकसंख्येचा व भौतिक सुविधेचा विचार करून शासनाने 10 जून 2015 ला नगरपंचायत स्थापन करण्यात आलेली आहे. परंतु सुरवातीला पानवाडी व फुलंब्रीच्या महसुली हद्दीचा वाद असल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकला नाही. शेवटी शासनानेच फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात अध्यादेश काढून निवडून प्रोग्रॅम जाहीर केला आणि डिसेंबर 2017 मध्ये ही निवडणूक घेण्यात आली. यामध्ये भाजपनेच बाजी मारली. प्रथम नगराध्यक्ष म्हणून सुहास शिरसाठ तर प्रथम उपनगराध्यक्षा म्हणून इंदूबाई मिसाळ यांची वर्णी लागली. निवडणूक झाल्यानंतर पहिले 26 जानेवारी 2018 चे ध्वजवंदन नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी केले. तर त्यांनतर येणाऱ्या महाराष्ट्र दिनी महिलांचा सन्मान म्हणून ध्वजवंदनाची जबाबदारी नगराध्यक्ष शिरसाठ यांनी उपनागराध्यक्षा इंदूबाई मिसाळ यांच्याकडे सोपविन्यात आल्याने श्रीमती मिसाळ यांनी ध्वजवंदन केले. यावेळी सन्मानीय नगरसेवक, ग्रामस्थ व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: maharashtra din celebrates in fulambri village