जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये मतमोजणी कार्यालयाबाहेर गोंधळ, पोलिसांनी कार्यकर्त्यांना दिला ‘प्रसाद’

Gram Panchayat Election Result Bhokardan1
Gram Panchayat Election Result Bhokardan1

भोकरदन (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील ८६ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी नवीन भोकरदन भागातील नगरपालिकेच्या मंगल कार्यालयात सोमवारी(ता.१८) पार पडली. मंगल कार्यालयात मतमोजणी सुरू असतांना कार्यालया बाहेर घोषणाबाजी करून गोंधळ घालणाऱ्या काही समर्थक व कार्यकर्त्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. त्यामुळे काही वेळ येथे गोंधळ निर्माण झाला होता.

गेल्या महिनाभरापासून तालुक्यातील राजकीय वातावरण ग्रामपंचायत निवडणूकीमुळे तापले होते. महत्त्वाच्या व मोठ्या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी जोर लावल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. ता.१५ जानेवारीला मतदान झाल्यानंतर आज सोमवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी नगरपालिकेच्या मंगल कार्यालयाबाहेर उमेदवारांच्या हजारो समर्थक व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

त्यामुळे येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दरम्यान उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी निकाल मिळविण्यासाठी आत जाऊन निकाल लागल्यानंतर बाहेर येताच बाहेरचे समर्थक एकच जल्लोष करून घोषणाबाजी करीत होते. यादरम्यान काही समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी बॅरिगेटच्या आत येऊन जोरजोरात घोषणाबाजी व जल्लोष करून गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी त्यांना हुसकवण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यामुळे एकच पळापळ होऊन गोंधळ उडाला. पळता पळता अनेकजण पडले.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com