मराठवाड्यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 चे आयोजन  शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.ही माहिती स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरूवारी (ता.6) येथे पत्रकार परिषदेत दिली.
 

जालना- महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 चे आयोजन  शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.ही माहिती स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरूवारी (ता.6) येथे पत्रकार परिषदेत दिली.

स्पर्धेच्या उद्घाटनासाठी अभिनेता आरबाज खान तर समारोपाला माजी कृषीमंत्री शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती  राहणार आहे.पत्रकार परिषदेला  प्राचार्य  दयानंद भक्त, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष  अनिरूध्द खोतकर,ए.जे.बोराडे ,पंडित भुतेकर, अभिमन्यू खोतकर, विष्णू पाचफुले ,आदींची उपस्थिती होती.

खोतकर  पुढे म्हणाले की, या स्पर्धेत महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हा व महानगर पालिका क्षेत्रातून सुमारे 45 संघासह 900 कुस्तीगिर, 100 संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक 125 तांत्रिक अधिकारी (पंच) महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेचे 90 पदाधिकारी व प्रतिनिधी भारतातील प्रसिध्द कुस्तीपटू, दोन भारतीय कुस्ती संघ निरीक्षक, दोन भारतीय शैली कुस्ती संघ निरीक्षक, एक महाराष्ट्र  आॅलम्पीक निरीक्षक असे सुमारे 1260 मल्ल व अधिकारी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

स्पर्धेचा प्रकार
ही स्पर्धा 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 किलो गट व  86 ते 125 किलो गादी गटामध्ये खेळविण्यात येईल. गादी गटामध्ये 10 व माती गटामध्ये 10 असे 20 खेळाडू प्रत्येक संघातून आपल्या जिल्ह्याच्या संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब जिकंणाऱ्या मल्लास दोन लाख रोख व चांदीची गदा बक्षीस देऊन गाैरविण्यात येणार आहे.

स्पर्धेचा समारोप माजी कृषीमंत्री जेष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 23 डिंसेबर रोजी होईल. स्पर्धेसाठी आझाद मैदानावर 2 मातीचे आखाडे तर दोन गादीचे आखाडे निर्माण केले जाणार आहेत.स्पर्धकांच्या निवासाची सोय केली जाणार आहे. या स्पर्धेसाठी रूस्तुमे हिंद दादु चैागुले अमोल बुचडे, भारत केसरी, गुलाम साबेर पहेलवान, अॅालम्पीयन मारोती आडकर, बंडा पाटील, ट्रीपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव, विजय चाैधरी, राष्ट्रकुल पदक विजेता राहुल आवारे क्रिकेटपटू विजय झोल, विष्णू जोशिलकर, सईद चाऊस, शिवाजी केकाण,चंद्रहार पाटील, विजय बराटे, आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती खोतकर यांनी दिली.

Web Title: Maharashtra Kesari Wrestling Competition to be held in Marathwada