मराठी क्रांती मोर्चाच्या राजस्तयरीय बैठकीस सुरवात

हरी तुगावकर
रविवार, 29 जुलै 2018

लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता. 29) रोजी
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठक येथे होत आहे. या बैठकीला
काही वेळापूर्वीच सुरवात झाली आहे.

लातूर - मराठा आरक्षणासाठी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी
लातूर जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी (ता. 29) रोजी
मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठक येथे होत आहे. या बैठकीला
काही वेळापूर्वीच सुरवात झाली आहे. या बैठकीत गेल्या काही दिवसात मराठा
आरक्षणाच्या मागणीवर सुरु असलेल्या आंदोलनात बलिदान दिलेल्यांना
श्रद्धांजली वाहण्यात आली.

येथील राहीचंद्र मंगल कार्यालयात ही बैठक सुरु झाली आहे. राज्यातील विविध
जिल्ह्यातील समन्वयक व मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी या
बैठकीला आले आहेत. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन, मराठा आरक्षण, शैक्षणिक सवलती, मराठा मुलांचे वस्तीगृहाबद्दल सरकारने घेतलेली भूमिका तसेच मराठा क्रांती मोर्चाच्या इतर मागण्याबाबत या बैठकीत दिवसभर चर्चा होणार आहे. तसेच आंदोलनाची पुढील दिशाही ठरविण्यात येणार आहे. या बैठकीला जिजाऊ वंदनेने सुरवात झाली. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात बलिदान गेलेल्या तसेच आंबेनळी घाटात बस दरीत कोसळून ठार झालेल्या 32 जणांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
 

Web Title: Maharashtra Kranti Morchas state level meeting begins