एलईडी दिवे वापरात महाराष्ट्र दुसऱ्यास्थानी

प्रकाश बनकर
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

'घरगुती, व्यावसायिक इतर विजेच्या ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्रालयाने एलईडी दिवे वाटप हा उपक्रम सुरू केला आहे. देशात सुरू झालेल्या या उपक्रमात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दोन कोटी 99 हजार एलईडीचे वाटप झाले. हा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.''
- सचिन शर्मा, राज्यप्रमुख, एलईडी वाटप कंपनी

गुजरात पहिल्या क्रमांकावर; ऊर्जा मंत्रालयातर्फे देशभर 18 कोटी दिव्यांचे वितरण
औरंगाबाद - वीज बचतीसाठी ऊर्जा मंत्रालयाने राबविलेल्या एलईडी दिवे वापराच्या उपक्रमात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला आहेत. तर गुजरात प्रथमस्थानी आहे. वर्षभरपासून सुरू झालेल्या एलईडी वितरण प्रणालीमध्ये देशात 18 कोटी 30 लाख दिव्यांचे वाटप करण्यात आले. तर राज्यात पुण्याने आघाडी घेतली असून या जिल्ह्यात 30 लाख एलईडी वाटप झाले आहेत.

केंद्रीय ऊर्जामंत्रालयातर्फे 2015 मध्ये देशभरातील घरगुती वीजग्राहकांमध्ये वीज बचतीसाठी खासगी कंपनीच्या माध्यमातून सात वॉटचे एलईडी दिवे वितरणाचे काम हाती घेण्यात आले होते. विजेबरोबर पैशांचीही बचत करणाऱ्या या एलईडीचा वापर सर्वत्र झपाट्याने वाढला. एलईडीचा वापर देशात गुजरातमध्ये सर्वाधिक करण्यात येत आहेत. गुजरातमध्ये 12 डिसेंबर 2016 पर्यंत दोन कोटी 76 लाख 80 हजार 677 दिव्यांचे वितरण झाले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र असून राज्यात दोन कोटी 99 हजार 729 दिव्यांचे वितरण झाले आहे. तिसऱ्या स्थानावरील आंध्र प्रदेशात एक कोटी 90 लाख 29 हजार 436, चौथ्यास्थानी राजस्थान असून तेथे एक कोटी 19 लाख 2 हजार 350, पाचव्या स्थानी- उत्तर प्रेदश - एक कोटी 11 लाख 37 हजार 154, सहव्या स्थानी कर्नाटक असून तेथे एक कोटी 38 लाख 38 हजार 214 एलईडीचे वाटप करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात एलईडीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत यांचा वापर करण्यात येत आहे. राज्यातील पुणे शहरात 26 लाख, तर ग्रामीणमध्ये चार लाख एलईडी दिवे वापरण्यात येत आहेत. त्यानंतर नागपूरचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यात 13 लाख एलईडीचे वितरण करण्यात आले.

Web Title: maharashtra second number in led lamp use