esakal | भोकरदन (जालना) : दानवेंच्या गावात जल्लोष | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

छायाचित्र

संतोष दानवे (भाजप) 32 हजार 325 मतांनी विजयी

भोकरदन (जालना) : दानवेंच्या गावात जल्लोष | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना - भोकरदन विधानसभा मतदार संघात केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र तथा भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांचा  32 हजार 325 मतांनी  विजयी झाले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमदेवारी चद्रकांत दानवे यांचा पराभव केला.

शरद पवार म्हणतात...

भाजपचे उमेदवार संतोष दानवे यांनी सुरवातीपासून आघाडी घेतली होती. ती कायम ठेवत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. संतोष दानवे दुसऱ्यांदा भोकरदन विधानसभा मतदारसंघातुन विजयी झाले  आहे. संतोष दानवे यांनी सुरवातीपासून मतदानात आघाडी कायम ठेवली असून प्रत्येक फेरीमागे त्यांच्या मताधिकक्यात वाढ होत गेली. 

युतीचे उडाले पाच मंत्री

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी चिरंजीव संतोष दानवे यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली होती. ऐरवी दिल्लीत व्यस्त असलेल्या दानवेंनी भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघावर आपले लक्ष केंद्रीत करून तिथेच मुक्काम ठोकला होता. 

हेही वाचा - राणेंनी राखला किल्ला

विधानसभा निवडणूक सोपी जावी म्हणून रावसाहेब दानवे यांनी सगळी सुत्र आपल्या हाती घेतली होती. तसेच मोठ्या प्रमाणात तालुक्‍यात इतर पक्षातून मेगाभरती सुरू केली होती. गेल्या तीन महिन्यापासून भाजपामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले होते. रावसाहेब दानवे व आमदार संतोष दानवे पिता-पुत्रांनी जणू काही "यारे या सारे या' असा पवित्रा घेतल्याचे तालुक्‍यात चित्र होते. 

धनंजय मुंडे म्हणतात - जनतेनं मला वाचवलं

रावसाहेब दानवे लोकसभा निवडणुकीच्या वेळी आजारी असताना देखील त्यांना विना प्रचार ते तीन लाखांवर मताधिक्‍य मिळवून विजयी झाले होते. भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघातून त्यांना 50 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. विशेष म्हणजे त्यांच्या अनुपस्थितीत आमदार संतोष दानवे यांनी तेव्हा मतदारसंघ पिंजून काढला होता. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नुकतीच जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी संतोष दानवे यांनी भाजपचे जुने कार्यकर्ते ,राष्ट्रवादीतील काही नाराज गट, तसेच आजी माजी जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेऊन भाजपमध्ये आणले होते. रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील संघाच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, गावातील टपरीवर बसून सर्वसामान्यांशी "चाय पे चर्चा' करत दानवे पिता-पुत्रांनी निवडणुकीची मोहिम जोरात राबविली होती. 

विरोधकांना चकवा.. 

विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे बळ संपवण्याची रणनिती रावसाहेब दानवे यांनी आखली होती. परिणामी तालुक्‍यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेचे पदाधिकारी, नगरसेवक व अन्य कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन दानवेंनी विरोधकांना चकवा दिला होता. तालुक्‍यात सुरू असलेली विकासकामे, कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे व सक्षम विरोधकांचा अभाव या जोरावर संतोष दानवे दुसऱ्यांदा निवडून आले आहे.