हिंगोली : भाजपच्या आशा कायम । Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

हिंगोलीत बाराव्या फेरीत तान्हाजी मुटकुळे आघाडीवर

हिंगोली -  हिंगोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी बाराव्या फेरी अखेर भाजपाचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे 17 हजार 642 मतांनी आघाडीवर होते.  तर काँग्रेसेचे भाऊराव पाटील गोरेगावकर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. आमदार मुटकुळेची विजयाकडे यांची वाटचाल सुरू आहे. 

धनंजय मुंडे म्हणतात - जनतेनं मला वाचवलं

हिंगोली विधानसभा मतदार संघात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाली येथे मतमोजणी मात्र संथ गतीने सुरू होती फेरीचे निकाल येण्यास वेळ लागत होता. जिल्‍ह्‍यातील कळमनुरी व वसमत विधानसभेत मात्र तातडीने  फेऱ्याचे निकाल सुरू होते. हिंगोली विधानसभा मतदार संघातील भाजपाचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवत ती बाराव्या फेंरीपर्यत कायम ठेवली होती. 

एवढ्या सगळ्या धामधुमीतही - राणेंनी राखला किल्ला

बाराव्या फेरीत श्री. मुटकुळे यांना 17 हजार 642 मतांची आघाडी मिळविली होती. बाराव्या फेरीत आमदार तान्हाजी मुटकुळे यांना 69 हजार 823 मते मिळविली तर काँग्रेसचे भाऊराव पाटील गोरेगावकर यांना 52 हजार 181 मते मिळाली आहेत. या आघाडीमुळे त्‍यांची विजयाकडे वाटचाल सुरू असल्याचे स्‍पष्ट दिसून येत आहे. पहिल्या फेरीपासून त्‍यांची आघाडी कायम सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Hingoli trends afternoon