नांदेड उत्तर : विद्यमान आमदारांना धक्का | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. 

नांदेड : नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये विद्यमान कांग्रेसचे आमदार डी.पी.सावंत यांना शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी मोठा धक्का दिला आहे. नांदेड उत्तरमधुन कांग्रेसचे विद्यमान आमदार डि. पी. सावंत हे यंदा तिस-यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. 

मतमोजणीच्या पहिल्या पहिल्या फेरीपासूनच बालाजी कल्याणकर यांनी आघाडी घेतलेली आहे. दुपारी 12.30 पर्यंतच्या सातव्या फेरीअखेर बालाजी कल्याणकर 9 हजार 414 मताने आघाडीवर आहे. दोन नंबरला कांग्रेसचे डि. पी. सावंत , तीन नंबरला वंचितचे मुकुंद चावरे तर चौथ्या क्रमांकावर एमआयमचे फेरोजलाला आहेत.   नांदेड उत्तर मतदारसंघ हा कांग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येथे सलग दोनदा कांग्रेसचे डी.पी. सावंत विजयी झाले आहेत. मात्र यंदा शिवसेनेचे बालाजी कल्याणकर यांनी विजयासाठी आव्हान उभे केले आहे.

बालाजी यांचा जनसंपर्क मोठा असून प्रत्येकाच्या सखादु:खमध्ये ते हिरिरीने सहभागी होतात. सामाजिक कार्यकर्ते ते नगरसेवक या नात्याने कायम जनतेच्या मनात असलेले बालाजी कल्याणकर आहेत. त्यामुळे मतदारांनी त्यांना कौल दिल्याचे सातव्या फेरीअखेर मिळालेल्या मतांवरून दिसून येते. सावंत यांचे मतदान एमआयम आणि वंचितच्या उमेदवारांनी घेतल्याचे बोलले जात आहे. तसा सावंत यांचा संपर्कही नसल्याने त्याचाही फटका त्यांना बसू शकतो.

सातव्या फेरीअखेर एकुण मते

  • बालाजी कल्याणकर - 24083
  • डी. पी. सावंत - 15469
  • फेरोजलाला (एमआययम) 4222
  • मुकुंद चावरे(वंचित) 9511

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Nagar Karjat jamkhed trends afternoon