परळीत ओन्ली 'डीएम'; पंकजा मुंडे तब्बल एवढ्या मतांनी पिछाडीवर | Election Results

प्रा. प्रविण फुटके
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

२० हजार मतांच्या आघाडीनंतर धनंजय मुंडे समर्थकांचा जल्लोष सुरु

परळी : पहिल्या फेरीपासून सुरु झालेली धनंजय मुंडे यांची आघाडी कायम राहत १२ व्या फेरीअखेर २० हजार ९०० मतांनी आघाडी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे समर्थकांनी जल्लोष सुरु केला आहे. 

परळीत भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत शेवटचे दोन दिवस कथीत क्लीपभोवती फिरले. त्यानंतरही आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

दरम्यान, गुरुवारी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून धनंजय मुंडे आघाडी घेत राहीले. फेरिगणिक त्यांची आघाडी वाढतच होती. १२ व्या फेरी अखेर धनंजय मुंडे यांना २० हजार ९८१ मतांची आघाडी मिळाली. धनंजय मुंडे यांना ६२ हजार २४२ मते मिळाली. तर, भाजपच्या पंकजा मुंडे यांना ४१ हजार २६१ मते मिळाली. मतांची मोठी आघाडी मिळाल्यानंतर परळी शहरात धनंजय मुंडे समर्थकांनी जल्लोष करायला सुरुवात केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Parali trends Dhananjay munde leading