परळी : पंकजा मुंडेंना मोठा धक्का | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

परळी (जि. बीड) -  राष्ट्रवादी काँग्रेसेचे धनंजय मुंडे यांनी पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी पाचव्या फेरीअखेरही कायम आहे. परळीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे असा सामना होत आहे. पहिल्याच फेरीत धनंजय मुंडे यांनी 499 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर आता पाच फेऱ्या मोजून झाल्या आहेत. धनंजय मुंडे सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. नुकतीच मुंडे
यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली.

परळी (जि. बीड) -  राष्ट्रवादी काँग्रेसेचे धनंजय मुंडे यांनी पहिल्या फेरीत घेतलेली आघाडी पाचव्या फेरीअखेरही कायम आहे. परळीत पंकजा मुंडे व धनंजय मुंडे असा सामना होत आहे. पहिल्याच फेरीत धनंजय मुंडे यांनी 499 मतांची आघाडी घेतली होती. त्यानंतर आता पाच फेऱ्या मोजून झाल्या आहेत. धनंजय मुंडे सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. नुकतीच मुंडे
यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली.

राज्याचे लक्ष लागलेल्या आणि शेवटपर्यंत अटीतटीच्या ठरलेल्या आताच्या परळी आणि पूर्वीच्या रेणापूर मतदारसंघावर 1978 पासून पंडितराव दौंड यांचा अपवाद वगळला तर मुंडेंकडेच आमदारकी राहिलेली आहे. पाच वेळा दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे आणि दोन वेळा दिवंगत रघुनाथराव मुंडे आमदार राहिले. दोन वेळा आमदार राहिलेल्या पंकजा मुंडेयांच्याविरोधात धनंजय मुंडे यांचा सामना आहे. मागच्या वेळी पराभव झाल्यानंतर यावेळी धनंजय मुंडे ताकदीने मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाल्यानंतर परळीत 'पीएम येवो की सीएम, हवा फक्त डीएमचीच' (धनंजय मुंडे) असा विश्‍वास धंनजय मुंडे यांनी व्यक्‍त केला होता. कथित क्‍लीपवरून गुन्हा, भोवळ आणि अश्रुधारा असा या निवडणुकीचा शेवट झाला. आता परळी कोणत्या मुंडेंकडे जाते, याकडे लक्ष लागले आहे. 
 
झाले 70 टक्के मतदान
परळी विधानसभा मतदारसंघात सरासरी 70 टक्के मतदान झाले. पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीण-भावासह 16 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त झाले. मतदानप्रक्रिया शांततेत व सुव्यवस्थेत पार पडली.  परळी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत 335 मतदान केंद्रावर सोमवारी मतदान झाले. सकाळी अकरानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर मतदारांनी मोठी गर्दी केली. देशमुख टाकळी येथे महिलाराज होते. येथे सखी मतदान केंद्र उभारण्यात आले होते.

महाराष्ट्रात हायव्होल्टेज मतदारसंघ अशी ओळख असलेल्या या मतदारसंघात एकूण 16 उमेदवार नशीब अजमावत आहेत. प्रत्येक उमेदवाराने प्रचारकाळात आपापल्या परीने प्रयत्न केला. सोमवारी मतदारराजाने कोणाच्या पदरात आपले दान टाकले हे 24 तारखेलाच उघड होणार आहे. दरम्यान, विधानसभा मतदारसंघात पुरुषांपेक्षा तीन टक्के अधिक महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 election result Parali trends middle phase