सिल्लोड (जि. औरंगाबाद) : सत्तारांचा धनुष्यबाण जोरात । Election Results 2019

Abdul Sattar
Abdul Sattar

औरंगाबाद : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होणार असे चित्र होते, परंतु 21 व्या फेरीअखेरीस समोर आलेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून इथे शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांचाच जोर कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. अपक्ष प्रभाकर पालोदकर यांच्यावर सत्तार यांनी 13 हजार 736 मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे. 

सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह इतर सगळे पक्ष एकत्रित आले होते. परिवर्तन घडवण्याचा दावा पालोदकर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांकडून केला जात होता. परंतु सिल्लोडमध्ये पक्ष बदलला तरी सत्तार यांचेच नाणे चालत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यानंतर सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करत थेट मतदारसंघच भाजपकडून हिसकावून घेतला होता. त्यामुळे चवताळलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रभाकर पालोदकर यांना कॉंग्रेसची अधिकृत उमेदवारी नाकारायला लावून अपक्ष लढण्याची गळ घातली. सगळी भाजप तुमच्या पाठीशी उभी करून तुम्हाला निवडूण आणू असा दावा देखील करण्यात येत होता. 

तालुक्‍यात मराठा फॅक्‍टरची हवा देखील निर्माण करण्यात सत्तार विरोधकांना यश देखील आले होते. पण ऐनवेळी बाजी पलटवण्यात माहिर असलेल्या सत्तार यांचा करिश्‍मा मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच दिसायला सुरूवात झाली होती. 21 व्या फेरीअखेरीस सत्तार 13 हजार 736 मतांनी आघाडीवर आहेत. अब्दुल सत्तार यांना 96003, तर अपक्ष प्रभाकर पालोदकर यांना 82267 मते मिळाली आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com