esakal | उमरगा (जि. उस्मानाबाद) :शिवसेनेचे ज्ञानराज चौगुलेंची हॅटट्रीक | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

Shivsena's Dnyanraj Dhondiram  Chaugule won

काँग्रेसचे दत्तू ऊर्फ दिलीप भालेराव यांचा पराभव

उमरगा (जि. उस्मानाबाद) :शिवसेनेचे ज्ञानराज चौगुलेंची हॅटट्रीक | Election Results 2019

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा - अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघातील चुरशीच्या लढतीत विद्यमान आमदार ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांनी तिसऱ्यांदा विजयश्री साधून हॅटट्रिक केली आहे, त्यांनी प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार दत्तू उर्फ दिलीप रोहिदास भालेराव यांचा २५ हजार ५८६ एवढ्या मतांची आघाडी घेऊन पराभव केला. मनसेचे जालिंदर
कोकणे तिसऱ्या तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार रमाकांत गायकवाड यांना चौथ्या क्रमांकाची मते मिळाली.

उमरगा विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडून रिंगणात होते. उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघाची सोमवारी एकूण दोन लाख ९७ हजार १३७ मतदारापैकीं एक लाख ६८ हजार ६७९ मतदान झाले होते. गुरुवारी सकाळी आठपासून पंचायत समितीच्या सभागृहात मतमोजणीस सुरवात करण्यात आली. एकूण चौदा टेबलवर २३ फेऱ्यातून मतमोजणीला सुरवात झाली. पहिल्या फेरी अखेरीस शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांनी १२३५ मतांची आघाडी घेतली. १४ व्या फेरीपर्यंत त्याच्या मतांची टक्केवारी वाढतच राहिली.

१५ व १६ व्या फेरी अखेरीस १८ हजार ७४० मतांची आघाडी घेतली होती. २३ व्या फेरी अखेरीस श्री. चौगुले यांना ८५ हजार ८२८ तर पोस्टल ९४५ असे ८६ हजार ७७३ एवढी मते मिळाली, काँग्रेसचे दत्तू भालेराव यांना ६० हजार ६९१ तर पोस्टल ४९६ असे ६१ हजार १८७ मते मिळाली. जालिंदर कोकणे यांना ७७८२, पोस्टल ५३ असे ७८३५ तर रमाकांत गायकवाड यांना ५७ पोस्टलसह सात ४७६ एवढी मते मिळाली. शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी काँग्रेसचे उमेदवार दिलीप भालेराव यांचा २५ हजार ५८६ मतांनी पराभव केला.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विठ्ठल उदमले, सहाय्य निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, विजय अवधाने, नायब तहसीलदार विलास तरंगे, डॉ रोहन काळे, एम आर मल्लुरवार, रणजीत शिराळकर, डी. पी. स्वामी, एम. डी. पांचाळ यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, पोलिस उपनिरिक्षक ए. टी. मालुसरे आदींनी चोखबंदोबस्त ठेवला होता.

११ उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे :

 • आमदार ज्ञानराज चौगुले ( शिवसेना) ८६ हजार ७७१,
 • दत्तु रोहिदास भालेराव ( काँग्रेस) ६१ हजार १८७, 
 • जालिंदर कोकणे (मनसे) सात हजार ८३५ 
 • रमाकांत लक्ष्मण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) सात ४७६, 
 • तानाजी वैजीनाथ गायकवाड (बहुजन समाज पार्टी) 
 • एक १९९,
 • सचिन जयहिंद देडे (बळीराजा पार्टी) 
 • ४३९ 
 • संदीप धर्मा कटबू (बहुजन विकास आघाडी) 
 • २९३, अपक्ष उमेदवार : रावसाहेब श्रीरंग सरवदे ६३७ 
 • सूर्यकांत रतन चौगुले ८१४, 
 • दिलीप नागनाथ गायकवाड ५२३,
 • अमोल मोहन कवठेकर ६६१ 
 • नकारात्मक मतांची (नोटा) संख्या एक हजार ४१५ एवढी आहे.