Maratha Kranti Morcha : औरंगाबादेत कडकडीत बंद, अत्यावश्‍यक सेवेवरही परिणाम 

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाने गुरुवारी (ता. नऊ) क्रांतीदिनी सूर्य निघाल्यापासूनच शहरातील रस्ते बंद केले. शहरातील चौकाचौकात, तसेच अंतर्गत रस्त्यांवरही आंदोलकांनी ठिय्या देत रास्तारोको केला. हातातील भगवे झेंडे फडवकत घोषणाबाजीने लक्ष वेधले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. दरम्यान, काही खासगी डॉक्‍टरांचे दवाखाने, पेट्रोलपंप बंद होते. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवेवर परिणाम झाला. 

मूकमोर्चा ते ठोकमोर्चा असा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या मराठा आंदोलनाने आता आक्रमक रूप धारण केले आहे. क्रांतीदिनापासून मोर्चाला सुरवात झाल्यामुळे या दिनाचे विशेष महत्त्व आहे. शासनाकडून मागील पंधरादिवसांपासून आंदोलन थांबविण्याचे जोरदार प्रयत्न झाले; मात्र समाजाने हे प्रयत्न हाणून पाडले. बुधवारी (ता. आठ) येथे झालेल्या मराठा समन्वयकांच्या राज्यव्यापी बैठकीत क्रांतीदिनी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यानंतर रात्रीच रस्त्यावर उतरण्याचे नियोजन करून सकाळपासून युवकमंडळी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले आहेत. 

शहरातून वाहनफेरी 
शहरभर वाहनांवरून फिरून दुकाने बंद झाली की नाही, याची पाहणी करण्यात आली. यावेळी युवकांनी हाती मशाली घेत सरकारला जागे होण्याचा संदेश दिला. एकही दुकाने उघडे राहता कामा नये, अशा सूचना आंदोलकांनी दिल्या.

Web Title: #MaharashtraBand Maratha Kranti Morcha Aurangabad Band