Maratha Kranti Morcha : औरंगाबाद-बीड महामार्गावर चक्काजाम

दिलीप दखने
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

वडीगोद्री (जालना) - वडीगोद्री येथे औरंगाबाद बीड रोडवर  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बाजारपेठ शाळा, महाविद्यालय बंद. ठेवून एक तासा पासुन, आंदोलन सुरू केले आहे. 

मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता.९) क्रांतिदिनी मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने वडीगोद्री अंतरवाली  आदी अनेक गावांमध्ये सर्व व्यवहार बंद आहे 

सकाळी नऊ वाजता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मुख्य रस्त्याने घोषणा देत मंठा फाट्या पर्यंत मोर्चा काढून राज्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. बसगाडी आली नसून ग्रामीण भागातील काही प्रवासी दुचाकी, रिक्षाने महत्वाची खरेदी व रुग्णास दवाखान्यात घेऊन आले आहे. परंतु, सर्व बाजार पेठे तसेच शाळा, महाविद्यालय व बहुतेक कार्यालय बंद असल्याने महत्वाचे काम असणाऱ्याना परत जावे लागत आहे. 

बंद मधून दवाखाने व औषधी दुकाने वगळण्यात आल्याने रुग़्णांना उपचार व औषधी मिळत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने दिवसभर शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: #MaharashtraBand Maratha Kranti Morcha chakkajam on aurangabad-beed highway