Maratha Kranti Morcha :किल्लारीत फडणवीस सरकारची अंत्ययात्रा

विश्वनाथ गुंजोटे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

किल्लारी, (जि. लातूर), ता. ९ : सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंद साठी किल्लारीसह  सिरसल, चिंचोली, मोगरगा मोड, लामजना गाव पाटी याठिकाणी गुरुवारी (ता. ९) सकाळी सात वाजल्यापासुन बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. 

बैलगाडी, जनावरांसह, नागरिकांनी रस्त्यावर उतरुन चक्का जाम केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  प्रतिमेचे  अंत्ययात्रा काढुन शोकाकुल वातावरणात प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी आरक्षण मिळालेच पाहीजे अशा घोषणा देण्यात आल्या. किल्लारीसह परिसरातील  शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली. तसेच बससेवा, व्यापारी,  बँक, पेट्रोल पंप  सकाळपासुन बंद ठेवण्यात आली. सर्वत्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

किल्लारी सह परिसरात टायर जाळून आंदोलन सुरू केले.  लामजना येथे पहिल्यांदाच कडकडीत बंद पाळण्यात आले. सिरसल पाटी येथे लहान मुलाने आरक्षण आदी मागण्याबाबत मार्गदर्शन केले. ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Web Title: #MaharashtraBand Maratha Kranti Morcha :Kallarit Fadnavis government's funeral