Maratha Kranti Morcha : कास्ट्राईबतर्फे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार

योगेश पायघन
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

औरंगाबाद - घाटी रुग्णालयात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संपकाळात नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रुग्णसेवेत मोठा हातभार लावला. या विद्यार्थ्यांसाठी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने प हिल्या शिफ्ट ला जाणाऱ्या व रात्रीच्या शिफ्टहून घरी जाणाऱ्या सेवार्थींसाठी सकाळच्या नाष्टयाचे वाटप करण्यात आले. 

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, उपअधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रमोद पिंपळकर उपप्राचार्य रमेश शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास राठोड, डॉ. अनिल पुंगळे, डॉ. ज्ञानेश्वर, डॉ. सरफराज यांची उपस्थिती होती. 

यासंदर्भात बोलताना संघटनेचे नेते विलास जगताप, अनिल पांडे  म्हणाले की, आम्ही संपत सहभागी नसलो तरी, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दोन दिवसांपासून नर्सिंग कॉलेजच्या दोनशे विद्यार्थ्यांनी घाटातील रुग्णालयातील रुग्णसेवेवर परिणाम होऊ दिला नाही. याबद्दल त्यांचे कौतुक करावे लागेल.  दिवसरात्र सेवा करणाऱ्या या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही संघटनेचे राज्याध्यक्ष एन. एम. पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली. 

यावेळी संघटनेचे प्रेम सातपुते, सुरेश सोळंके, सुनील रत्नपारखे, अशोक कांबळे, दिलीप गोधणे, किशोर कीर्तिकर, मोहन सोलाट, दिलीप रगडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या संघटनेने संपात सहभागी न होण्याचा निर्णय संपापूर्वीच जाहीर केला होता.

Web Title: #MaharashtraBand Maratha Kranti Morcha : Nursing students have a snack