Maratha Kranti Morcha : भोकरदनमध्ये रास्ता रोकोसह बाजारपेठ बंद

दीपक सोळुंके
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

भोकरदन (जालना) : मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी गुरुवारी (ता.९) मराठा क्रांती मोर्च्याच्या वतीने भोकरदन शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये 
रस्ते आडवुन रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान शहरातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून स्वयंस्फूर्तीने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने सुरू आहे. गुरुवारी मराठा क्रांती मोर्च्याच्यावतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. शहरात सकाळी आठ वाजल्यापासून मराठा समाज बांधव छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले असून, छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून समाज बांधवांनी 'एकच मिशन मराठा आरक्षण',  'एक मराठा लाख मराठा' लिहलेल्या खादी टोपी घालून, हातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा असलेले झेंडे घेऊन आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दिवसभर शांततेत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, शहरातील बहुतांश शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पोलिसांच्या वतीने शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्वांनी शांततेच्या मार्गाने बंद पाळावा असे आवाहन सकल मराठा बांधवाच्या करण्यात येत आहे.

Web Title: #Maharashtraband Maratha Kranti Morcha rasta roko in bhokardan jalna