Maratha Kranti Morcha: जालना: राजुर-फूलंब्री मार्गवार चक्का जाम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

तळेगाव येथील बाजारपेठे, केंद्रीय शाळा, खाजगी व्यवसाय,दुध केंद्र आदी बंद असुन हा बंद आज सकाळ पासुन दिवसभर शांतेतेच्या मार्गाने चालु राहणार आहे.

तळेगाव (जि. जालना) : भोकरदन तालुक्यातील तळेगाव मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सकल मराठा समाजातर्फे येथे राजुर फुलंब्री मार्गावर ८ वाजेपासून चक्का जाम आंदोलन सुरू झाले.

मराठा तरूणांवर दाखल केले गुन्हे मागे घेण्यात यावे आदी मागण्यासह घोषणांनी परिसर दणाणून गेला. शहरात काही ठिकाणी टायर जाळल्याचीही घटना घडल्या आहेत.

तळेगाव येथील बाजारपेठे, केंद्रीय शाळा, खाजगी व्यवसाय,दुध केंद्र आदी बंद असुन हा बंद आज सकाळ पासुन दिवसभर शांतेतेच्या मार्गाने चालु राहणार आहे.

Web Title: #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha agitation in Jalna