Maratha Kranti Morcha: लातुरात मोटारसायकल रॅली

Latur
Latur

लातूर : मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने लातूर बंदला सुरु असून सकाळी साडे नऊ वाजता शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. याला मोठा प्रतिसाद मिळाला.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे. या मागणीसाठी गुरुवारी लातूर बंदचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात सकाळपासून आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यात सकाळी साडे नऊ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात आली.  

राजीव गांधी चौकातून रॅलीला सुरवात झाली. शिवाजी चौक, पीव्हीआर चौक गंजगोलाई, मुख्य रस्त्यावरून ही रॅली काढण्यात आली. या वेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com