Maratha Kranti Morcha: नांदेड जिल्ह्यात शांततेत बंद; पोलिस अधीक्षक रस्त्यावर

प्रल्हाद काबंळे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

आसना बायपास, शंकरराव चव्हाण चौक गाडेगाव, काकांडी, मालेगाव, नेरली, मुसलमानवाडी, लिंबगाव, नाळेश्‍वर, सिडको, चंदासिंग कॉर्नर, पिंपळगाव, बारड या भागात रस्त्यावर झाडे तोडून रास्ता रोको केला. तर काही भागात रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला.

नांदेड : मराठा आरक्षणासंदर्भाने गुरूवारी (ता. नऊ) पुकारलेल्या राज्यस्तरीय बंदला जिल्ह्यात सकाळी (दहा) वाजेपर्यंत बंद शांततेत पाळण्यात आला.

आसना बायपास, शंकरराव चव्हाण चौक गाडेगाव, काकांडी, मालेगाव, नेरली, मुसलमानवाडी, लिंबगाव, नाळेश्‍वर, सिडको, चंदासिंग कॉर्नर, पिंपळगाव, बारड या भागात रस्त्यावर झाडे तोडून रास्ता रोको केला. तर काही भागात रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला.

शहर व जिल्ह्यातील सर्वच व्यवहार ठप्प असून पेट्रोलपंपही बंद करण्यात आले आहेत. यामुळे वाहनधारकांची चांगलीच कसरत होत आहे. मात्र आंदोलक रुग्णवाहिका व अंत्यविधीला जाणाऱ्या नागरिकांना रस्ता मोकळा करून देत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. आसना बायपास नागपूर ते हैद्राबाद रस्त्यावर शिवसेनेचे शहरप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, राजेश पाटील, हिंगोली युवा सेनेचे बाजीराव सवंडकर, शिवाजी सवंडक, अंकुश कोकाटे, रमेश कोकाटे, मारोती जाधव यांच्यासह आदी कार्यकर्ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असल्याचे पहावयास मिळाले.

तसचे पोलिस अधिक्षक संजय जाधव हे रस्त्यावर उतरून कायदा व सुरक्षेची माहिती घेत आहेत. कर्तव्यावरील प्रत्येक कर्मचाऱ्याची अचानक तपासणी करीत अाहेत. आयटीआय भागात त्यांनी उपस्थित पोलिसांची हजेरी घेऊन बंदोबस्तबाबात सुचना दिल्या. 

Web Title: #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha agitation in Nanded