Maratha Kranti Morcha: औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर बस पेटवली

मनोज साखरे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

घटनेनंतर अग्निशामक दल, सिडको पोलिस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी वेळीच उपाय योजना केली. बस व टायर नेमके कुणी पेटवले हि बाब अद्याप समोर आली नाही.

‌औरंगाबाद : औरंगाबाद-जळगाव रस्त्यावरील जाधववाडी मार्केटजवळील मोकळ्या मैदानात उभी खाजगी बस अज्ञातांनी पेटवून दिली.

त्यानंतर लगतच टीव्ही सेन्टर येथील जळगाव रस्त्यावर पाच ट्रकचे खराब टायर पेटवून देण्यात आले. या घटना गुरुवारी (ता. 9) पहाटे चार ते पाच दरम्यान उघडकीस आल्या. 

घटनेनंतर अग्निशामक दल, सिडको पोलिस आणि वाहतूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले. त्यांनी वेळीच उपाय योजना केली. बस व टायर नेमके कुणी पेटवले हि बाब अद्याप समोर आली नाही.

Web Title: #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha in Aurangabad