Maratha Kranti Morcha मराठवाड्यात कडकडीत बंद 

शेखलाल शेख
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

- आठ ही जिल्ह्यात आंदोलनाची धग 
- बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये बंद 
- ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर 
- बहुतांश ठिकाणी रास्ता रोको 
- चक्काजाम आंदोलन 
- पोलिसांचा सर्वच ठिकाणी तगडा बंदोबस्त 

औरंगाबाद - क्रांतीदिनी पुकारण्यात आलेल्या बंदला मराठवाड्यात मोठा प्रतिसाद मिळाला असून, आठ ही जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. सकाळपासून आंदोलकांनी चक्का जाम करुन आंदोलन सुरु केलेले आहे. शहरासह ग्रामीण भागातील सर्वच ठिकाणी रास्ता आंदोलन करण्यात येत आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर टायर पेटवुन घोषणाबाजी करण्यात आली. 

मराठवाड्यातील बाजारपेठा, शाळा, महाविद्यालये, वाहतुक सेवा पुर्णपणे बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट आहे. 

आंदोलक ठिकठिकाणी रस्त्यावर फिरुन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत आहे. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहे. औरंगाबाद शहरात शंभर टक्के बंद असून, ठिकाठिकाणी आंदोलन रस्त्यावर फिरत आहे. तर बहुतांश महत्वाचे चौक बंद करण्यात आले आहे. पोलिसांनी शहरात तगडा पोलिस बंदोबस्त आहे. जालना जिल्ह्यात ही ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. शहरा पुर्णपणे बंद झालेले आहे. जालना शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली, नव्हा चौक, राजुर चौफुली, कन्हैयानगर, गोलपांगरी, यासह भोकरदन, परतुर, अंबड, घनसवांगी, बदनापुर, जाफराबाद, मंठा तालुक्‍यात ठीक ठिकाणी आंदोलन सुरु करण्यात आले. लातुर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात बंद आहे. येथे पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

Web Title: #Maharashtrabandh Maratha Kranti Morcha bandh in marathwada