Maratha Kranti Morcha : उस्मानाबाद: 300 जणांचा रक्तदान करुन आंदोलनाला पाठिंबा 

सयाजी शेळके
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

उस्मानाबाद - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गुरुवारी (ता. नऊ) शहरात बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर ठिय्या मांडला. तर सुमारे ३०० मराठा कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आरक्षणाची मागणी लावून धरली. विशेष म्हणजे काही मुस्लिम बांधवांनी ठिय्यामध्ये सहभाग नोंदवून मराठा आरक्षणाला पाठींबा दिला. 

उस्मानाबाद - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गुरुवारी (ता. नऊ) शहरात बंद पाळून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर ठिय्या मांडला. तर सुमारे ३०० मराठा कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आरक्षणाची मागणी लावून धरली. विशेष म्हणजे काही मुस्लिम बांधवांनी ठिय्यामध्ये सहभाग नोंदवून मराठा आरक्षणाला पाठींबा दिला. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गुरुवारी आंदोलन करण्याचा इशारा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिली होता. त्यानुसार सकाळी १० वाजता कार्यकर्ते एक-एक करीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर जमू लागले. त्यानंतर थोड्याच वेळात मोठ्या संखेने कार्यकर्ते एकत्र आले. त्यासोबतच रक्तदान करण्याचा सेटही हजर झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. ‘मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे.‘ अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. 

शहरात शुकशुकाट 
दरम्यान मराठा समाजाच्या वतीने शहर बंदचेही आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासूनच शहरातील बहुतांश दुकाने बंद होती. प्रमुख बाजारपेठ असलेल्या नेहरू चौक, मारवाड गल्ली, काळामारुती चौक भागातील बहुतांश दुकाने बंद होती. दरम्यान अत्यावश्‍यक सेवा म्हणजे औषधांची दुकाने मात्र सुरू होती. 

३०० कार्यकर्त्यांनी केले रक्तदान 
दरम्यान गेल्या आंदोलनामध्ये शहरात मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर शहरात तगडा पोलिस बंदोबदस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान उस्मानाबादच्या आंदोलनाचा वेगळा आदर्श निर्माण करण्यासाठी शहरात मराठा कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुपारर्यंत सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून मराठा आंदोलनाची मागणी केली. 

मुस्लिम बांधव आंदोलनात 
शहरातील काही मुस्लिम बांधवांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. तसेच ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदवून मराठा आरक्षणाची मागणी केली. यावेळी मराठा कार्यकर्त्यांनी मुस्लिम आरक्षण मागणीच्या घोषणा दिल्या. 

Web Title: #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha Osmanabad: Supporting the movement by donating 300 people blood donation