परभणी: पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडून पाहणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

बंद काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये साठी पोलिसांनी अगोदरच खबरदारी घेतली आहे. शहरातील संवेदनशिल भागात पोलिसांची जादा कुमक लावण्यात आली आहे.

परभणी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता.नऊ) पुकारण्यात आलेल्या बंदसाठी संपूर्ण शहरात मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. गुरुवारी सकाळीच पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराची पाहणी केली.

बंद काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये साठी पोलिसांनी अगोदरच खबरदारी घेतली आहे. शहरातील संवेदनशिल भागात पोलिसांची जादा कुमक लावण्यात आली आहे.

शहरातील वसमतरस्ता, मुख्य बाजारपेठ असलेल्या शिवाजी चौक, गांधी पार्क, गुजरी बाजार, स्टेशनरोडवर पोलिसाचे वेगवेगळे पथक तैनात करण्यात आले आहेत. या बंदोबस्ताची पाहणी गुरुवारी सकाळी पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलिस अधिक्षक विश्व पानसरे, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी संजय परदेशी यांनी केली आहे.

Web Title: #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha Police alert in Parbhani