Maratha Kranti Morcha परभणी-गंगाखेड रस्त्यावर दगडफेक; बसचालक गंभीर

भास्कर लांडे
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

गंगाखेड आगाराची बस प्रवासी घेऊन गंगाखेडहून परभणीकडे निघाली होती. दरम्यान, रात्री साडेसात वाजता तरोडा पाठीवर अज्ञाताकडून या बसवर अचानक दगडफेक झाली. त्यात बसच्या समोरील काचा फुटल्याने चालक मधुकर कुकडे यांच्या डोक्यात दगड लागला.

परभणी : परभणी ते गंगाखेड महामार्गावरील तरोडा पाटीवर झालेल्या दगडफेकीत बस चालक गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी (ता.७) रात्री साडेसात वाजता ही घटना घडली. दगडफेकीचे कारण अस्पष्ट आहे.

गंगाखेड आगाराची बस प्रवासी घेऊन गंगाखेडहून परभणीकडे निघाली होती. दरम्यान, रात्री साडेसात वाजता तरोडा पाठीवर अज्ञाताकडून या बसवर अचानक दगडफेक झाली. त्यात बसच्या समोरील काचा फुटल्याने चालक मधुकर कुकडे यांच्या डोक्यात दगड लागला. त्यामुळे रक्तस्त्राव झाल्याने श्री. कुकडे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून या मार्गावरील बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. लातूरकडून आणि परभणीहून जाणाऱ्या बसेस बंद केल्याची माहिती विभागीय नियंत्रक जा.ना. शिरसाट यांनी दिली.

Web Title: #MaharashtraBandh Maratha Kranti Morcha stone pelting in Parbhani