महावितरणची 7 कोटी वसुली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

नगरसेवकांनी दिली साथ; आठ हजार ग्राहकांनी भरली थकबाकी

औरंगाबाद: महावितरणतर्फे थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी राबविण्यात येत असलेल्या धडक मोहिमेने चांगलाच जोर धरला आहे. मोहिमेत आठ हजार ग्राहकांकडून 7 कोटी 27 लाख 75 हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. सहा हजार 228 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला. तसेच 444 ग्राहकांची वीज कायमस्वरूपी खंडित करण्यात आली आहे. वसुलीसाठी नगरसेवकांनी साथ दिल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

महावितरणने औरंगाबाद ग्रामीणमधील पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सिल्लोड, फुलंब्री, सोयगाव परिसरातील 508 वीज ग्राहकांकडून 16 लाख 61 हजार रुपये वसूल केले. जालना जिल्ह्यातील 682 वीज ग्राहकांकडून 38 लाख 46 हजार रुपयांची थकबाकी वसूल करण्यात आली.

नगरसेवकांची साथ
महावितरण छावणी उपविभागातील सादातनगर, राहुलनगर येथील नगरसेवक नाविद रशीद यांच्या कार्यालयात औरंगाबाद शहर मंडळचे अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल, औरंगाबाद शहर विभाग एकचे कार्यकारी अभियंता ए. पी. पठाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय घनबहादूर यांच्यासह वीज ग्राहकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नाविद रशीद यांच्याकडे ग्राहकांकडे असलेल्या थकीत वीज बिलाची यादी सुपूर्द कण्यात आली. या वेळी त्यांनी ग्राहकांकडे असलेली थकबाकी बिलाच्या वसुलीरून वसुलीचे आश्‍वासन दिले.

रमानगरात वीज तोडली
क्रांती चौक उपविभागातील रमानगर येथे बिल वसुलीसाठी गेलेल्या अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांच्यासह पथकाला महिला व पुरुषांनी विरोध केला. पोलिसांना पाचारण केल्यानंतर एक लाख रुपयांसाठी आठ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. थकीत बिलाचा भरणा केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा जोडण्यात येणार नाही. परस्पर कोणी वीज पुरवठा जोडून घेतल्यास संबंधितांवर विद्युत कायदा 2003 नुसार कडक दंडात्मक कारवाई करण्याचे संधितांना आदेश देण्यात आले आहेत. थकीत रक्‍कम भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी केले आहे.

Web Title: mahavitaran 7 million recovery