ग्राहकांच्या खिशावर महावितरणचा दरोडा

Mahavitaran
Mahavitaran

औरंगाबाद - नवीन वीज मीटर घेणाऱ्या ग्राहकाला केबल (सर्व्हिस वायर) दुकानातून विकत आणावी लागत आहे. विशेष म्हणजे, सिक्‍युरिटी डिपॉझिट, सर्व्हिस चार्ज आणि प्रोसेसिंग फीसच्या नावाने शुल्क वसुली करूनही केबलच्या नावाने हात वर करून ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. 

महावितरणकडे रीतसर वीज मीटरची मागणी केली तर अनेक दिवस तिष्ठत ठेवले जाते. आर्थिक लुबडणूक केली जाते. कनेक्‍शन देताना केबल नाही, असे सर्रास कारण सांगून ग्राहकाला व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी थेट दुकानदाराकडे पाठविले जाते. मुळात वीज कनेक्‍शन देताना विद्युत मीटर, सर्व्हिस वायर बसवून वीज घरापर्यंत आणून देण्याची जबाबदारी ही महावितरणची आहे.

यासाठी महावितरण सिक्‍युरिटी डिपॉझिट, सर्व्हिस कनेक्‍शन चार्ज, प्रोसेसिंग फीस आणि गुड्‌स ॲण्ड सर्व्हिस टॅक्‍स वसूल करते. ग्राहकाच्या खिशातून ही वसुली केल्यानंतरही ग्राहकांना केबल बाहेरून का आणण्यास सांगितली जाते, हा खरा प्रश्‍न आहे. विशेष म्हणजे आमच्याकडे केबल संपली असे सांगितल्याने अगोदरच मीटर मिळेपर्यंत त्रस्त झालेला ग्राहक नाइलाजाने दुकानात जाऊन केबल घेऊन येतो.

अनेकांचा होतो नाइलाज
ग्राहकांना प्रामाणिकपणे वीज घ्यावयाची आहे; मात्र महावितरणची यंत्रणा सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याने अनेकजण नाइलाजाने नवीन कनेक्‍शन घेण्याऐवजी शेजाऱ्यांच्या मीटरमधून कनेक्‍शन घेत आहेत. झोपडपट्टी आणि सामान्यांच्या वसाहतीत नवीन मीटर घेण्याऐवजी सरळ शेजाऱ्यांकडून वीज कनेक्‍शन घेऊन त्यांना विजेचे पैसे दिले जातात. छोटे व्यापारी, दुकानदारही जवळच्या अन्य दुकानदारांकडून कनेक्‍शन घेऊन विजेची गरज भागवीत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com