
महावितरण कंपनीचे सहायक अभियंता मोहम्मद जिलानी यांना कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे.
परळी वैजनाथ (जि.बीड) : महावितरण कंपनीचे सहायक अभियंता मोहम्मद जिलानी यांना कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवून निलंबित करण्यात आले आहे. शहरातील महावितरण कंपनीच्या स्थानिक कार्यालयात कार्यरत असलेले सहायक अभियंता मोहम्मद जिलानी यांनी १३ नोहेंबर रोजी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ७.३० ते ११.३० पर्यंत ३३ के.व्ही. केंद्रातील मुख्य लाइनची तार तुडवल्याने वीज पुरवठा बंद पडला होता.
त्या लाईनची आपण वेळेवर दुरुस्ती केली नाही. त्यामुळे वीजपुरवठा अनेक काळ बंद राहिल्याने शहरातील ग्राहकांचा महावितरण कंपनीवर रोष व्यक्त केला होता. त्याचप्रमाणे आधिपत्याखाली कर्मचारी कधीही ११ के.व्ही लाइनवर लाईन ट्रीप करतात. त्यावर नियंत्रण नाही. वीज ग्राहकांना व्यवस्थित न बोलणे, तक्रारीचे वेळेवर निवारण न करणे, मोठ्या प्रमाणावर थकबाकी असताना वसुली न करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे. अधीक्षक अभियंता रवींद्र कोलप यांनी ही निलंबन कारवाई केली आहे.
संपादन - गणेश पिटेकर