esakal | महावितरण कंपनीत एकाच दिवसांत १७ कर्मचाऱ्यांवर कारवाई, वसुली जोमात की कोमात जाणार?

बोलून बातमी शोधा

Mahavitaran News Osmanabad}

गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत पत्रव्यवहार सुरू होता. दोन दिवसांपूर्वी अधीक्षक अभियंता यांना लातूर कार्यालयातून कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानंतर जिल्ह्यातील वीज कंपनीचे कार्यालय पूर्णपणे हादरले.

महावितरण कंपनीत एकाच दिवसांत १७ कर्मचाऱ्यांवर कारवाई, वसुली जोमात की कोमात जाणार?
sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने १७ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड चालविली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून गैरहजर राहणे, वसुली न करणे अशी कारणे सांगत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अधीक्षक अभियंता यांच्यावर कारवाई टाळण्यासाठी हा प्रकार केला असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. जिल्ह्याच्यी वसुली अपेक्षित कक्षेत होत नसल्याने वरिष्ठ कार्यालयाकडून वारंवार विचारणा सुरू होती. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत पत्रव्यवहार सुरू होता. दोन दिवसांपूर्वी अधीक्षक अभियंता यांना लातूर कार्यालयातून कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यानंतर जिल्ह्यातील वीज कंपनीचे कार्यालय पूर्णपणे हादरले. दोन्ही विभागातून तब्बल १७ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

वसुलीचे दिले कारण
जिल्ह्यातील अनेक कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून गैरहजर आहेत. तर काहीजण मुख्यालयी राहत नाहीत. शिवाय याचा परिणाम वसुलीवरही झाला आहे. जिल्ह्यात वसुलीचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे उस्मानाबाद विभागातील १४ तर तुळजापूर विभागातील तीन लाईनमेन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हेही वाचा - Maharashtra Budget 2021: राज्याच्या अर्थसंकल्पात मराठवाड्याचा रेल्वेप्रश्न 'जैसे थे', पर्यटन राजधानी औरंगाबादला ठेंगा

स्वतःवरील कारवाई टाळण्यासाठी?

लातूर येथील वरिष्ठ कार्यालयातून अधीक्षक अभियंता यांनाही कारवाईसाठी लक्ष केले होते. वसुली होत नसल्याने कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यामुळे स्वतःवरील कारवाई टाळण्यासाठी छोट्या १७ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असल्याची ओरड कर्मचारी वर्गातून होत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कर्मचारी काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान या कारवाईने पुन्हा वसुली थांबते की वेगाने धावते, याचीही चर्चा सामान्य वर्गात होत आहे.

जिल्ह्यातील वसुली झालेली नाही. कर्मचाऱ्यांचे कामावर लक्ष नाही. अनेक गावातून तक्रारी आहेत, काही कर्मचारी गावात राहत नाहीत. यामुळे महावितरणची प्रतिमा मलिन होत आहे. परिणामी या १७ कर्मचाऱ्यावर कारवाई केली आहे.

- श्रीकांत पाटील, अधीक्षक अभियंता, महावितरण कंपनी

संपादन - गणेश पिटेकर