माहूर गडावर परिक्रमा यात्रेकरिता लाखो भाविक

बालाजी कोंडे
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

प्रशासनातर्फे यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून सत्तर एस टि बसेस राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिल्या आहेत. नगरपंचायतीने वाहनतळ , शहरात स्वच्छता व परिक्रमामार्गा वरिल पथदिवे सुरु केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केली आहे प्रत्येक विभाग आपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडीत आहेत अशी माहिती तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिली.

माहूर : माहूर गडावर रक्षाबंधन निमित्त नारळी पोर्णिमेची भव्य दिव्य परिक्रमा यात्रा भरते या यात्रेस शेकडो वर्षाची परंपरा असून नित्यनेमाने दरवर्षी यात्रा मोठ्या भरविण्यात येते.

रविवारी (ता.6) सकाळ पासून भाविकाची गडावर गर्दी होण्यास सुरुवात झाली दुपारपर्यंत गड भाविकांनी फुलून गेला. परिक्रमा यात्रा ही माहूरगडा वरिल सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून घनदाट जंगलातून पायवाटेने तीस किलोमीटर परिसरातील देवदेवतांचे भाविक दर्शन घेतात. चोवीस तासात तिन ते चार लाख भाविक विविध देवदेवतांची दर्शन घेतात यामध्ये श्री रेणूकादेवी, श्री दत्तशिखर, श्री अनुसया माता मंदीर, कमंडलूतीर्थ, काळापाणी, सयामाताची टेकडी, माततीर्थ, पांडवलेणी, श्री देवदेवेश्वरी मंदीर,वनदेव, कैलासटेकडी, शेख फरिद बाबा दर्गाह, सर्वतीर्थ यांचा समावेश आहे.

प्रशासनातर्फे यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली असून सत्तर एस टि बसेस राज्य परिवहन महामंडळाने उपलब्ध करून दिल्या आहेत. नगरपंचायतीने वाहनतळ , शहरात स्वच्छता व परिक्रमामार्गा वरिल पथदिवे सुरु केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केली आहे प्रत्येक विभाग आपली जबाबदारी व्यवस्थीत पार पाडीत आहेत अशी माहिती तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिली. मातृतीर्थ तलावा मार्गावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी दिली आहे.

Web Title: mahurgad devotee in mahur