'आरएसएस' अफवा पसरविणारे मुख्य केंद्र - लक्ष्मण माने

हरी तुगावकर
सोमवार, 2 जुलै 2018

लातूर : राज्यात गेल्या काही दिवसात मुले पळवणारी टोळी आली आहे. अशी अफवा पसरवून भटक्या विमुक्तांवर हल्ले केले जात आहेत. यातूनच साक्री  (जि. धुळे) येथे पाच भटक्या विमुक्तांचा खून करण्यात आला. या सर्वांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने ताब्यात घ्यावेत. त्यांच्यावर मंगळवेढ्यात अंत्यविधी केले जाणार आहेत. राज्यातील भटक्या विमुक्तांनी धुळ्याकडे जावू नये असे आवाहन भटक्या विमुक्त जाती जमाती संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार लक्ष्मण माने यांनी सोमवारी (ता.२) येथे पत्रकार परिषदेत केले. अफवा पसरवून हे हल्ले होत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

(आरएसएस) हे अफवा पसरविणारे प्रमुख केंद्र आहे, अशी टीकाही त्यांनी  यावेळी केली.

साक्री येथे घटनेतील कुटुंबिय हे क्रिमनल नव्हते. भटके असल्याने पोटभरण्यासाठी तेथे गेले होते. तेथे त्यांनी सरपंच व पोलिस पाटलांकडे नोंदही केली होती. असे असताना पाच जणांना मारहाण करून खून करण्यात आला.  इतरासोबतच सरपंच व पोलिस पाटलांवरही खूनाचा गुन्हा नोंद झाला पाहिजे. राज्यातील भटके-विमुक्त धुळ्याकडे निघाले आहेत. त्यांनी तिकडे जावू नये. कुटुंबियांनी देखील पार्थिव ताब्यात घेवून मंगळवेढ्याला यावे. (ता.4 जुलै) रोजी सर्वांनी मंगळवेढ्यात एकत्र यावे, असे आवाहन माने यांनी  केले.

समाजात अस्वस्थता राहिली पाहिजे ही राज्यकर्त्यांची गरज बनली आहे. दलित
 सवर्णवाद, जाती जातीत भांडणे, अफवा पसरवून भटक्यावर हल्ले करण्याचे
 प्रकार वाढले आहेत. आरएसएस तर अफवा पसरविणारे मुख्य केंद्र आहे. यापुढेही 
अशाच अफवांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यांची ही आयडॉलॉजीच आहे, अशी
 टीकाही त्यांनी केली.

भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व कम्युनिस्ट पक्ष देखील हे सर्व एकाच माळेचे मनी आहेत. आम्ही आश्रीत होतो त्यावेळेस त्रास नव्हता पण आता सत्तेत वाटा मागू लागलो की त्रास देणे सुरु करण्यात आले  आहे. आज समाज जागा झाला आहे. मराठा समाजाने पेशव्यांसारखे बाजूला बसले पाहिजे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आता वंचित  बहुजन आघाडी स्थापन करण्यात आल्याचे माने म्हणाले. यावेळी अॅड. प्रकाश  आंबेडकर, प्रा. अविनाश डोळस आदी उपस्थित होते.

Web Title: The main center for spreading RSS rumors - Laxman Mane