वीस हजार जणांना ‘मैत्रेय’त चुना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

जालना - दामदुप्पटचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या विरोधात ता. एक डिसेंबर २०१७ रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आतापर्यंत २० हजार गुंतवणूकदारांची नावे पुढे आली आहेत. कंपनीच्या दोन मुख्य संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती तपास अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. देवकर यांनी दिली आहे.

मैत्रेय कंपनीमध्ये अनेकांनी पैशांची गुंतवणूक केली होती. मात्र, त्यानंतर आपली फसगत झाल्याचे गुंतवणूकदारांना लक्षात आल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणाचा तपास प्रगतिपथावर असून नाशिक सेंट्रल कारागृहातून सदर बाजार पोलिसांनी लक्ष्मीकांत श्रीकृष्ण नार्वेकर (वय ५०, रा. बी. १६, सुशीला आपार्टमेंट, शनिमंदिराजवळ रमेदी वसई (पश्‍चिम, जि. पालघर) व विजय शंकर तावरे (वय ४९, रा. फुलपाडा, विरार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर) या दोन मैत्रेय कंपनीच्या मुख्य संचालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक विचारपूस पोलिसांकडून करण्यात येत आहे.  

आतापर्यंत २० हजार गुंतवणूकदारांची माहिती एकत्रित केली असून अजूनही गुंतवणूकदारांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, मैत्रेय कंपनीच्या गुंतवणूकदारांची रक्कम परत करण्यासंदर्भात राज्यस्तरावर एका केंद्रीय समितीची स्थापन करण्यात आलेली आहे. ही समिती गुंतवणूकदारांचे परतावे परत करण्यासंदर्भात प्रयत्न करीत आहे, असे श्री. देवकर यांनी सांगितले.

Web Title: maitreya company Cheating Crime