esakal | माजलगाव : कार, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार, दोन जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात

माजलगाव : कार, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार, दोन जखमी

sakal_logo
By
पांडुरंग उगले

माजलगाव (जि. बीड) : कार, दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भिषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शहरापासून जवळ असलेल्या दुगड पेट्रोलपंपाजावळ राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी (ता. २) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश वसंत डांगे (वय १८, रा. रोशनपुरी, ता. माजलगाव) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तालुक्यातील रोशनपुरी येथील गणेश वसंत डांगे, वसंत डांगे (वय ४२) अविनाश डांगे ( वय १४ ) सर्व रा. रोशनपुरी हे तिघे बापलेक कामानिमित्त माजलगावला आले होते. माजलगावमधील काम अटोपून रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ते परत रोषणपुरीला त्याच्या दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी परभणी रस्त्यावरील दुगड पेट्रोलपंपाजवळ आली असती समोरून भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली.

हेही वाचा: परीक्षार्थींनो Best Luck; पोलिस बंदोबस्तात उद्या भरतीची लेखी परीक्षा

या भीषण अपघातामध्ये गणेश डांगे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर, वसंत डांगे, गणेश डांगे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर माजलगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी आंबाजोगाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .

loading image
go to top