esakal | माजलगाव : धरणाच्या पायथ्याशी आखाड्यात अडकले आजोबा नातू
sakal

बोलून बातमी शोधा

अडकले आजोबा नातू

माजलगाव : धरणाच्या पायथ्याशी आखाड्यात अडकले आजोबा नातू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : शहरा लगत असलेल्या देवखेडा येथे धरणाच्या पायथ्याला असलेल्या शेतातील आखाड्यात आजोबा व नातू अडकून पडले आहेत. चार तासानंतरही विविध प्रयत्न करूनही त्यांना बाहेर काढता आले नाही.

येथील धरणाचे पाणी वाढल्यानंतर आजोबा नातवाला घेऊन झाडावर चढले असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले. आज ता 7 मंगळवारी चार वाजता धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानंतर धरणाच्या पायथ्याशीच असलेल्या आखाड्यात रामप्रसाद गोविंद कदम व त्यांचा सात वर्षांचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठयात बसले होते.

अचानक पाण्यात वाढ झाल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. व या दोघांनी बाजूला असलेल्या झाडावर चढून आपले प्राण वाचवले.त्यांनी झाडावर चढल्यानंतर आरडाओरड व फोन केल्यानंतर ही बाब लक्षात आली.

घटनास्थळी तहसीलदार वैशाली पाटील व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय फराटे तळ ठोकून होते. पाण्यात भोई बांधवानी जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जास्त पाण्यामुळे जात येत नव्हते. दरम्यान परळी येथून बचाव पथकाच्या कर्मचा-याना पाचारण करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.

loading image
go to top