माजलगाव : ‘पणन’ने थकविले बाजार समितीचे एक कोटी रुपये

सहा महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा; अद्यापही नाही मिळाली रक्कम
बाजार समिती
बाजार समिती esakal

माजलगाव : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाने गतवर्षी खरेदी केलेल्या कापसाची मार्केट फी, सुपरव्हिजन फी लाईपोटी बाजार समितीला देण्यात येणारी एक कोटी चार लाख ७१ हजार ५५६ रुपये थकविले आहेत. इतकी मोठी रक्कम अडकल्याने कर्मचारी, कामगारांचे पगार देण्यासाठी अडचण येत आहे. सहा महिन्यांपासून पाठपुरावा करूनही पणनकडून थकलेली रक्कम अद्यापही मिळालेली नाही.

माजलगाव तालुक्यात दरवर्षी कापसाचे मोठे उत्पादन होत असून गतवर्षी शासनातर्फे कापसाची खरेदी करण्यात आली होती. माजलगाव बाजारपेठ मोठी असल्याने याठिकाणी परभणी, जालना जिल्ह्यातील आसपासच्या गावातूनही शेतकरी कापूस विक्रीसाठी णतात. तालुक्यातील जिनिंगमार्फत खरेदी केलेल्या कापसाच्या प्रती क्विंटल एक रुपया प्रमाणे बाजार समितीला मार्केट फी, सुपरव्हिजन फी तोलाईपोटी मिळते. गतवर्षीचा कापूस खरेदी हंगाम मार्च महिन्यातच संपला होता. गतवर्षी तालुक्यातील एकूण ९ खरेदी केंद्रावरून एक लाख ६२ हजार ६५ क्विंटल कापसाची खरेदी महाराष्ट्र कापूस उत्पादक पणन महासंघाने केली आहे. या खरेदीपोटी पणन महासंघाकडून बाजार समितीला एकूण एक कोटी चार लाख ७१ हजार ५५६ रुपये येणे होते. कापूस खरेदीचा हंगाम संपून सात महिने होत आले असताना अद्यापही पणन महासंघाने बाजार समितीला दमडीही दिली नाही.

बाजार समिती
विरोधक म्हणतात ‘माफियाराज’; पोलिसदल केवळ पोस्टरबाजीत गुंग

यामुळे बाजार समितीचा कारभार हाकताना पदाधिकाऱ्यांची मोठी दमछाक होत आहे. एक कोटी रुपये थकल्यामुळे बाजार समितीतील कर्मचारी, हंगामी कामगार आदींचे पगार करायलाही मोठी अडचण येत आहे. यातच आता दिवाळीचा सम आल्यामुळे कामगारांना मिळणारा बोनसही अडचणीत आला आहे. बाजार समिती प्रशासनाकडून एप्रिल महिन्यापासून थकबाकी देण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत असताना अद्यापही पणनने पैसे देण्याबाबत कोणतीच कारवाई केलेली नाही. कर्मचारी, कामगारांची दिवाळी गोड करण्यासाठी तरी पणनने बाकी द्यावी अशी मागणी होत आहे.

पणनकडे असलेली थकबाकी

  • ९० लाख ७७ हजार ६९८ रुपये ः मार्केट फी

  • चार लाख ५३ हजार ८८२ रुपये ः सुपरव्हिजन फी

  • नऊ लाख ३९ हजार ९७६ रुपये ः तोलाई

  • एकूण एक कोटी चार लाख ७१ हजार ५५६ रुपये

थकलेली रक्कम देण्यासाठी मागील सहा महिन्यांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. यासाठी पणन मंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. दिवाळीच्या सन तोंडावर आल्याने पगार वाटप करण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे.

-संभाजी शेजूळ, सभापती, बाजार समिती, माजलगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com