
पालिकेच्या सभागृहामध्ये विवीध विषय समित्यांच्या निवडीसाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
माजलगाव, (जि बीड) : येथील नगर पालिकेमध्ये शुक्रवारी ता. २२ झालेल्या विषय समिती निवडीत भाजपा नगरसेविकांच्या नातेवाईकात आपसातच गदारोळ झाला. हा प्रकार पिठासन अधिकारी यांचेसमोर घडला असुन सभापतींच्या निवडी मात्र बिनविरोध झाल्या आहेत. पालिकेच्या सभागृहामध्ये विवीध विषय समित्यांच्या निवडीसाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिठासन अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व मुख्याधिकारी विशाल भोसले उपस्थित होते.
नगराध्यक्ष शेख मंजुर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. सभागृहात यावेळी नगरसेविका ऐवजी त्यांची मुले, पती हेच उपस्थित होते. भाजप नगरसेवकांच्या नातेवाईकांत निवडीत नाव कोणाचे द्यावयाचे यावरून आपसातच धावाधाव होऊन गदारोळ केला. काही नगरसेवक व मुख्याधिकारी भोसले यांनी उठुन मध्यस्थी केली तर अनुपस्थित असलेल्या महिला नगरसेवीकांना घरून बोलावण्यात आल्यानंतर अखेर बैठक पार पडली. मात्र सभापतींच्या निवडी बिनविरोध झाल्या.
मराठवाड्याच्या ताज्या बातम्या वाचा
यांच्या झाल्या निवडी
बांधकाम सभापती - रोहन घाडगे.
पाणीपुरवठा सभापती - शरद यादव.
महिला व बालकल्याण सभापती - उषा बनसोडे,
स्वच्छता सभापती - सुमन मुंडे.
शिक्षण सभापती - सय्यद राज अहेमद.
स्थायी समिती सदस्य - भागवत भोसले, तालेब चाउस, स्वाती सचिन डोंगरे.
संपादन - गणेश पिटेकर