पाच हजार क्विंटल कापूस आगीत खाक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

माजलगाव (जि. बीड) - फुलेपिंपळगाव (ता. माजलगाव) येथील मनकॉट जिनिंगला बुधवारी अचानक लागलेल्या आगीत तीन गंजींमधील पाच ते सहा हजार क्विंटल कापूस, तसेच एका शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या टेंपोसह कापूस जळून खाक झाला आहे.

माजलगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलेपिंपळगाव शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 वर मनकॉट जिनिंग आहे. या जिनिंगला अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. येथील कापसाच्या सात गंज्यांपैकी तीन गंज्या जळून खाक झाल्या. यामध्ये पाच ते सहा हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. या आगीत माजलगाव येथील शेतकरी शिवाजी प्रभाकर भागडे यांचा टेंपो कापसासह जळून खाक झाला आहे.

Web Title: majalgaon news cotton fire