केसापुरी परिसरात आढळली तीन कुपोषित बालके

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

माजलगाव - शहरालगतच असलेल्या केसापुरी वसाहतीजवळ पालावर राहणाऱ्या स्थलांतरित कुटुंबीयांकडे बुधवारी (ता.१२) सायंकाळी तीन कुपोषित बालके आढळली. आधार संस्थेच्या सत्यभामा सौंदरमल यांनी हा प्रकार उघडकीस आणला. 

माजलगाव - शहरालगतच असलेल्या केसापुरी वसाहतीजवळ पालावर राहणाऱ्या स्थलांतरित कुटुंबीयांकडे बुधवारी (ता.१२) सायंकाळी तीन कुपोषित बालके आढळली. आधार संस्थेच्या सत्यभामा सौंदरमल यांनी हा प्रकार उघडकीस आणला. 

राष्ट्रीय महामार्गालगतच्या केसापुरी वसाहतीजवळ पाल टाकून खरात कुटुंबीय राहते. आधार संस्थेच्या सत्यभामा सौंदरमल या शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करत असताना त्यांना या पालावर कुपोषणसदृश बालके आढळली. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधल्यानंतर या ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक गुरुवारी (ता. १३) दाखल झाले तर किट्टी आडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय पारगावकर यांनी गुरुवारी सकाळी सात वाजताच या पालावर येऊन प्रियंका मालूजी खरात (वय २ वर्षे) या बालिकेस बीड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. हा भाग सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत येतो. या ठिकाणी साक्षी सिकंदर खरात (वय आठ महिने) तर संगीता दादाराव चव्हाण (वय दोन वर्षे) या दोन्ही मुली पालावरच असून आरोग्य विभागाच्या पथकाने याची पाहणी केली. सादोळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत असलेल्या केसापुरी वसाहत परिसरात कुपोषित बालक आढळले असल्याची माहिती मिळताच सकाळी आठ वाजताच पालावर जाऊन या मुलीला पुढील उपचारासाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्याचे किट्टी आडगाव येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय पारगावकर यांनी सांगितले.

कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेनंतरही जन्मली दोन मुले
केसापुरी वसाहतीजवळील पालावर मालूजी खरात यांचे कुटुंब राहते. त्यांच्या पत्नी लंका खरात यांनी  कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केली आहे. यानंतरही लंका यांना दोन अपत्ये झाली. कुपोषित प्रियंका हिला १४ भावंडे होती. त्यापैकी तीन भावंडांचा मृत्यू झाला आहे तर नऊ बहिणी असून दोन भाऊ असा परिवार आहे. 

Web Title: majalgaon news Malnourished children