नवीन वर्षात होणार शिक्षणसेवक भरती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

माजलगाव - राज्यात शिक्षण सेवक पदांची संख्या हजाराहून अधिक रिक्त असल्याचे घोषित करण्यात आले. प्रत्यक्षात शिक्षण विभागाने पक्की संख्या जाहीर न करताच चाचणी परीक्षांच्या वेळापत्रक जाहीर केले. अद्यापही अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्‍न सुटलेला नाही. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. शिक्षणसेवक पदाच्या चाचणी परीक्षाचे वेळापत्रक १२ डिसेंबर ते २१ डिसेंबरदरम्यान ही चाचणी परीक्षा होणार आहे. या परीक्षेची घोषणा होताच खासगी शिकवणी वर्गाची जोरदार जाहिरातबाजी मराठवाड्यात सुरू झाली आहे.

या अभियोक्ता चाचणी परीक्षेसाठी कालावधी केवळ ३० ते ४० दिवस एवढाच आहे. यामुळे क्रॅश कोर्स परीक्षा वर्गाचे पेव फुटणार आहे. ही चाचणी परीक्षा कठीण असल्याची जाहीरातबाजी क्‍लासवाले करू लागले आहेत. या परीक्षेच्या तयारीसाठी पुस्तक प्रकाशनचा व्यवसाय तेजीत येणार आहे. चाचणी परीक्षेतील भरघोस यशासाठी याच प्रकाशनाची पुस्तके अशी जाहिरात केली जाते आहे. शिक्षण विभागाने चाचणी परीक्षेसाठी नेमके कोणती पुस्तके असावीत, याबाबतीत कसलेच मार्गदर्शन अद्याप जाहीर झाले नाही. याचा फायदा खासगी शिकवणी वर्गवाले घेत आहेत. खासगी शिकवणी वर्गाच्या जाहिरातबाजीत हमखास १०१ टक्के यशाची हमी दिली जात आहे. 

आमचा क्‍लास लावला तर बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त, तर कर चाचणी परीक्षेत ९५ टक्के गुणांची हमी देण्याची जाहिरातबाजी होत आहे. नोकरीच्या आशेने हजारो तरुण या खासगी क्‍लासच्या मागे धावणार आहेत. 

शिक्षण विभागाने यापूर्वी २०१० पासून शिक्षक पात्रता परीक्षा घेतली. या परीक्षेत पात्र ठरलेल्या किती शिक्षकांना नोकरीत घेतले, हे जाहीर करावे. गेल्या दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून अनेक शिक्षक विनाअनुदान तत्त्वावर नोकरी करीत आहेत. शिक्षण विभाग त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. सध्या काम करणारे शिक्षकांचे प्रश्‍न निकाली काढण्याऐवजी चाचणी परीक्षांचे नोकरीचे आमिष दाखवू नये.
- प्रवीण काळे, विनाअनुदानित शिक्षक, माजलगाव

Web Title: majalgaon news teacher recruitment