सेलू-पाथरी महामार्गावर अॅपेरिक्षा व ट्रकचा भीषण अपघातात

विलास शिंदे
रविवार, 24 जून 2018

सेलूहून भाविकांना सिमुरगव्हाण येथील स्वामी नरेंद्र महाराज यांच्या मठात घेवून जाणारा प्रवाशी अॅपेरिक्षा क्रमांक (एम. एच. २० टी. ३८०८) व पाथरीकडून विटाने भरलेला ट्रक क्रमांक (एम. एच. २०. ए. टी. १५९९) सेलूकडे येत असतांना सेलू-पाथरी महामार्गावरिल कुंडीपाटी जवळ भरधाव येणार्‍या ट्रकने समोरून येत असलेल्या अॅपेरिक्षाला जोरदार धडक दिली.

सेलू - सेलू-पाथरी महामार्गावर प्रवाशी अॅपेरिक्षा व ट्रकची समोरासमोर जोरदार धडक होवून झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला. तर सातजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. २४) ला सकाळी साडेसातच्या सुमारास कुंडी पाटीजवळ घडली.

सेलूहून भाविकांना सिमुरगव्हाण येथील स्वामी नरेंद्र महाराज यांच्या मठात घेवून जाणारा प्रवाशी अॅपेरिक्षा क्रमांक (एम. एच. २० टी. ३८०८) व पाथरीकडून विटाने भरलेला ट्रक क्रमांक (एम. एच. २०. ए. टी. १५९९) सेलूकडे येत असतांना सेलू-पाथरी महामार्गावरिल कुंडीपाटी जवळ भरधाव येणार्‍या ट्रकने समोरून येत असलेल्या अॅपेरिक्षाला जोरदार धडक दिली. यात अॅपेरिक्षा उलटून रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. तर ट्रक जागेवरच अाडवा झाला. अॅपेरिक्षातील प्रवाशी वैजेनाथ धोंडिबा बरेवाड (वय २६) रा. शिरूर अानंतपाळ जि. लातुर यांचा जागीच मृत्यु झाला तर अॅपेरिक्षा चालक प्रद्युम्न इंगळे (वय ३४) रा. बोरगाव, दत्ता कोसेवार (वय २५) रा. बिलोली जि. नांदेड, साईनाथ बोडखे (वय २८) रा. पोखर्णी जि. नांदेड, मधुकर सुरवसे (वय ४०) शिरूर अानंतपाळ जि. लातुर, सिध्देश्वर गव्हाडे (वय ३०) रा. गुंजरगाव, शंकर बुरेवाड (वय ३०) रा. कुंडलवाडी, सुनिल योगेकर (वय २५) रा. कुंडलवाडी हे सात प्रवाशी गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सेलू येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना परभणी येथे उपचारासाठी दाखल करण्यात अाले. दरम्यान अपघातानंतर विटाने भरलेला ट्रक रस्त्यावर उलटल्याने ट्रकमधील विटा रस्त्यावर पडल्याने रस्त्यावर विटांचा खच साचला. त्यामुळे सेलू-पाथरी मार्गावरिल वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प झाली होती. पोलिस प्रशासनाने क्रेनच्या साह्याने ट्रक रस्त्याच्या बाजुला केला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: major accident at selu pathari highway one died