esakal | 170 संख्याबळ सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते-सुरजितसिंह ठाकुर
sakal

बोलून बातमी शोधा

Majority, But Not Formed Government, Said Bjp Mla Surjitsingh Thakur

भाजपच्या मराठवाडा संघटन पर्वची कार्यशाळा औरंगाबाद येथे पार पडली. या कार्यशाळेस मराठवाड्यातील आमदार, जिल्हाध्यक्षांची उपस्थिती होती. . श्री.ठाकूर म्हणाले, महाराष्ट्रात कधी नव्हे असे घडले सकाळ, दुपारी, संध्याकाळ पत्रकार परिषदांचा सपाटा सुरु आहे. कोणतीही चर्चा काय प्रसारमाध्यमांमधून होते काय ?

170 संख्याबळ सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते-सुरजितसिंह ठाकुर

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश महामंत्री सुरजितसिंह ठाकुर यांनी शिवसेनेला बुधवारी (ता.20) लगावला. 

भाजपच्या मराठवाडा संघटन पर्वची कार्यशाळा औरंगाबाद येथे पार पडली. या कार्यशाळेस मराठवाड्यातील आमदार, जिल्हाध्यक्षांची उपस्थिती होती. श्री.ठाकूर म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेना महायुती म्हणून निवडणूक लढवल्या. जनतेनेही महायुतीला बहुमत दिले. निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, रश्‍मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचेही अभिनंदन केले. महाराष्ट्रात कधी नव्हे असे घडले सकाळ, दुपारी, संध्याकाळ पत्रकार परिषदांचा सपाटा सुरु आहे. कोणतीही चर्चा काय प्रसारमाध्यमांमधून होते काय ?

हेही वाचा- तानाजीं'शिवाय नाही "शेलारमामां'ना महत्त्व! 

दिल्लीत आता नवे मातोश्री 

170 संख्याबळ सांगणारे समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. त्या दिवशी प्रसारमाध्यमांनी तर त्यांचे फॅक्‍स आले आणि झालं असे सांगत त्यांचे खातेवाटपही जाहीर केले होते. सभापतीही ठरवला होता. यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी पेढे, पुरणपोळी भरवले, फटाके फोडले. पण सरकार स्थापन झाले नसल्याने हे फटके तुळशीचा लग्नाचे होते, असे सांगायला लागले. आता सोशल मीडियावर नव्या मातोश्रीचा फोटो व्हायरल होत असल्याचे सांगत दिल्लीत आता नवे मातोश्री झाले असल्याचा टोलाही शिवसेनेला श्री.ठाकूर यांनी लगावला.

हेही वाचा -राज्यपालांना भेटले शिवसेना आमदार अंबादास दानवे 


निश्‍चिंत रहा भाजपचे सरकार येईल 
राज्यामध्ये भाजपमुळेच तुमचे (शिवसेनेचे) निम्मे आमदार निवडुन आले असल्याचा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला. कार्यकर्त्यांनी दिल्लीत काय सुरु आहे, राज्यात काय होईल, याची चिंता करू नये. आपली भूमिका संयमाची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे श्री.ठाकूर म्हणाले. राज्यात भाजपला वगळून कोणाचेच सरकार होणार नाही. सरकार होईल. ते भाजपचे तुम्ही निश्‍चिंत राहा, असा सल्ला कार्यशाळेला आलेल्यां कार्यकर्त्यांना दिला त्यांनी दिला. 

पक्ष बांधणी मजबूत करा - विजय पुराणिक 

दायित्वाची जाणीव, जबाबदारीची जाणीव आणि क्षमता असलेला कार्यकर्ता असणे गरजेचा आहे पदाची लालसा असलेला नका, असे नमूद केले. पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, निवडणूक कार्यक्रम निर्धारित वेळेत योग्य पद्धतीने पार पाडा, असे आवाहनही त्यांनी करत संघटनात्मक निवडणूकीसाठी विभागाचा आढावा घेतला. या कार्यशाळेत निवडणूक पद्धती या विषयावर डॉ. कराड यांनी मार्गदर्शन केले.