राम मंदिर प्रकरणी कायदा करा; अन्यथा...- विहिंप

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

राम मंदिर प्रकरणात न्यायालयाने हिंदूंच्या सहनशिलतेचा कडेलोट केला आहे, आता मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने त्यांची संपूर्ण शक्ती, बुध्दी पणाला लावली पाहिजे अन्यथा आगामी काळात देशातील असंख्य हिंदूचा रोष उफाळून येईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी सोमवारी (ता. 3) दिला आहे.

परभणी-  राम मंदिर प्रकरणात न्यायालयाने हिंदूंच्या सहनशिलतेचा कडेलोट केला आहे, आता मंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने त्यांची संपूर्ण शक्ती, बुध्दी पणाला लावली पाहिजे अन्यथा आगामी काळात देशातील असंख्य हिंदूचा रोष उफाळून येईल असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री शंकर गायकर यांनी सोमवारी (ता. 3) दिला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देशभरात आयोजित हुंकार सभेच्या निमित्याने शंकर गायकर सोमवारी परभणी आले होते. ते म्हणाले, देशात राम जन्मभूमीचा निगेटीव्ह प्रचार होत आहे. तो थांबला पाहिजे. आम्ही कोणाच्या स्पर्धेमध्ये नाही. देशाचे प्रेरणास्थान श्रीराम आहेत. आता हा मुद्दा भारता पुरता राहिलेला नाही. केवळ हा जमीनीचा वाद नाही तर देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. न्यायालयाने देखील आमची हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही. 490 वर्षाचा संघर्ष न्यायालयाने दोन मिनिटात निकाली काढला हे कसे काय होऊ शकते असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

राममंदिर प्रकरणाशी सर्वसामान्यांच्या भावना जोडलेल्या आहेत. आता केंद्र सरकारच्यावतीने वेळ काढूपणा केला जात आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून हा प्रश्न सोडविला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला विनंती केली आहे. नऊ हजार पानांचे पुरावे न्यायालयाकडे सादर करण्यात आले आहेत. तरी ही मुस्लिमांकडून प्रतिसाद मिळत नाही ही खेदाची बाब आहे. खोदकामात ही त्याच जागेवर मंदिर असल्याचे पुरावे सापडले आहेत, मग केंद्र सरकार वाट कशाची पाहत आहे असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.

केंद्र सरकारने लोकसभेमध्ये प्रस्ताव पारित करावा, यासाठी आम्ही देशातील सर्व खासदारांना पत्र देणार आहोत. त्यांत त्यांना विनंती करणार आहोत की हा कायदा करून घेण्यासाठी पुढाकार घ्यावा. आगामी काळात हा वाद मिटवून मंदिर निर्माण करण्यास मदत करावी असे न झाल्यास देशातील असंख्य हिंदूंच्या रोषाचा उद्रेक होईल 
असा इशारा ही त्यांनी दिला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री अनंत पांडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हादराव क कानडे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र शहाणे, महानगर अध्यक्ष 
राजकुमार भांबरे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री सुनील रामपुरकर उपस्थित होते.

Web Title: Make a law of Ram temple Says VHP