पोटाला चिमटा घेऊन मुलाला पोहचविले यशाच्या शिखरावर

नवनाथ इधाटे
शनिवार, 28 एप्रिल 2018

फुलंब्री (औरंगाबाद) : शेती व टेम्पो चालवून पोटाला चिमटा घेऊन सलमानला यशाच्या शिखरावर पोहचविण्याचे काम त्याचे वडील शेख उमर यांनी केले आहे. फुलंब्री येथील शेख सलमान शेख उमर याने चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत देशातून 339 वी रँक मिळवून घवघवीत यश मिळविले आहे.

फुलंब्री (औरंगाबाद) : शेती व टेम्पो चालवून पोटाला चिमटा घेऊन सलमानला यशाच्या शिखरावर पोहचविण्याचे काम त्याचे वडील शेख उमर यांनी केले आहे. फुलंब्री येथील शेख सलमान शेख उमर याने चौथ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत देशातून 339 वी रँक मिळवून घवघवीत यश मिळविले आहे.

ग्रामीण भाग म्हणल्यावर शिक्षणाची सुविधा नाही, योग्य मार्गदर्शक नाही. या कोणत्याही गोष्टीला थारा न देता शेख सलमान शेख उमर यांने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर उज्जवल यश संपादन केले आहे. सकाळशी बोलताना शेख सलमान याने सांगितले की, अतिशय बिकट परिस्थितून आई- वडीलांनी माझ्या शिक्षणाचा खर्च केला आहे. केवळ दोन एकर शेती होती. त्यातून उदारनिवाह भागविणे कसरतीचे असल्याने वडिलांनी टेम्पो चालवून आम्हा भावंडांना शिकविले आहे.

शेख सलमानचे पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण फुलंब्रीतील जिल्हा परिषद शाळेच्या उर्दू माध्यमामध्ये झालेले आहे. आठवी ते दहावीचे शिक्षण अलिआलान स्कुल कसाबखेडा, कन्नड येथे झालेले आहे. त्यांनतर 11-12, बीएसस्सी, एमएस्सी मौलाना आझाद महाविद्यालय औरंगाबाद येथे झालेले आहे. उर्दू माध्यमामातून शिक्षण घेऊन यूपीएसीची 2014-15 पासून शेख सलमान याने तयारी सुरू केली होती. सुरवातीला औरंगाबाद, पुणे आणि शेवटच्या दोन वर्षापासून दिल्ली येथे शेख सलमान तयारी करीत होता. घरची अत्यंत बिकट परिस्थिती असल्याने क्लासेस, राहण्याचा व खाण्यापिण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात होत होता. मात्र तरीही सलमानचे वडील शेख उमर हे शेती व टेम्पो चालवून सतत पैसे पाठवत राहिले.

दिल्लीला गेल्यानंतर वातावरनात बदल झाल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. तेथील मुलांचे शैक्षणिक गुणवत्ता चांगली असल्याने मला सतत प्रेरणा मिळत राहायची आणि मी 2016 पासून दररोज 8 ते दहा तास अभ्यास करायचो.  बघता बघता तेथील मित्र भेटत गेले आणि त्यांच्या सहवासात राहून आपण कुठे कमी आहोत याची जाणीव त्यांच्याकडून नियमित करून घेत असे. शेख सलमान यांचे दोन तीन मित्र कलेक्टर बनलेले आहे. त्यांच्याकडून वेळोवेळो मार्गदर्शन घेण्याचे काम सलमाननी केले. यूपीएसीची तयारी करीत असताना तीन वेळेस अपयश आले. परंतु सलमानचे वडील शेख उमर यांनी सलमानला सतत प्रोत्साहन देऊन पुढे जाण्याचा रास्ता मोकळा करून देत होते.

खर्चाचा मोठा प्रश्न निर्माण होत होता परंतु शेख उमर यांनी मुलाचव शिक्षण करीत असताना कोठेही तडजोड केली नाही. सलमानचा मोठा भाउ सॉफ्टवेअर इंजिनीयर आहे. तर लहान भावाचे अजून शिक्षण सुरू आहे. मुलांचे शिक्षणातून उज्वल भविष्य घडविण्याचे काम सलमानच्या आई वडिलांनी केले आहे

अभ्यास करताना सलमान समोर असलेले दोन शेर
1) मेरा तारिक अमिरी नहीं, फकिरी है ! खुदी ना बेच गरिबी मे नाम पैदा कर.....!
----
2) खुद को कर बुलंद इतना की, हर तकदिर से पहिले खुदा बंदे से पुछे बता 'तेरी रझा क्या है....!

आई - वडिलांच्या चेहऱ्यावरील हास्य माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यांच्यामुळेच आज मी या यशाच्या शिखरावर पोहचू शकलो. एमपीएससी, यूपीएससीची तयारी करीत असलेल्या मुलांनी आगोदर घ्येय डोळ्यासमोर ठेऊन त्या दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामध्ये असंख्य अडचणी येईल, कित्येक वेळा अपयश सुद्धा येईल.परंतू तरीही खचून न जाता अभ्यासाचे सातत्य कायम ठेवावे. आपल्या आई- वडिलांनी केलेल्या कष्ट सार्थक करण्याचे काम करायला पाहिजे. 
- शेख सलमान शेख उमर, फुलंब्री

Web Title: make sacrifice and educate son