जिल्ह्यात हजारांवर कुपोषित बालके

Malnutrition
Malnutrition

सॅम १४१; तर मॅम बालकांची संख्या १,२९३
औरंगाबाद - जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयोगटातील तब्बल १ हजार ४३४ बालके कुपोषित आहेत. यामध्ये तीव्र काटकुळे आणि मध्यम काटकुळ्या बालकांचा समावेश आहे. याशिवाय अतिशय कमी वजनाच्या बालकांची संख्या ३ हजार १८८ इतकी आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल अखेरीस जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील ३ लाख ९५ हजार ३५३ बालकांचे वजन घेण्यात आले. त्यापैकी १ लाख ८६ हजार ५७० सर्वसाधारण बालके आढळली आहेत; तर मध्यम कमी वजनाच्या बालकांची संख्या १५ हजार ३७२ इतकी आहे. अतिशय कमी वजनाच्या बालकांची संख्या ३ हजार १८८ एवढी आढळली आहे. 

सॅम (सीव्हियर ॲक्‍यूट मालन्यूट्रिशन) म्हणजे अतिशय लुकडी किंवा काटकुळ्या बालकांची संख्या १४१ तर मॅम (मीडियम ॲक्‍यूट मालन्यूट्रिशन) बालकांची संख्या १ हजार २९३ एवढी आहे. या कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी त्यांना अंगणवाड्यांतून पूरक पोषण आहार दिला जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com