औरंगाबाद - अतिरिक्त आयुक्तांच्या श्रीमुखात भडकवली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

औरंगाबाद : नाल्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या श्रीमुखात संतप्त युवकाने भडकावल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (ता. 22) सकाळी सिडको एन-6 भागात घडली. गुरुवारी (ता.21) रात्री या ठिकाणी एका युवकाचा नाल्यात बुडून मृत्यू झाला होता.

शहरात शुक्रवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नाल्यांना पूर आला. बजरंग चौक भागात चेतन चोपडे (वय-35) हा युवक बुलेटसह रात्री दीड वाजता नाल्यात पडला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. सकाळी महापौर नंदकुमार घोडेले, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासह अधिकारी-कर्मचारी पाहणीसाठी गेले असता एका युवकाने, श्रीकृष्ण भालसिंग यांच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर महापालिका कर्मचारी व नागरिकांमध्ये झटापटही झाली.

Web Title: a man beats additional commissioner in aurangabad