जालन्याच्या कुंडलिका नदीत बुडून एकाचा मृत्यू, मृताचा शोध सुरु

1crime1_7
1crime1_7

जालना : जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीत बुडून एका पुरुषाचा सोमवारी (ता.सात) मृत्यू झाला आहे. नदीपत्रातून मृतदेह वाहताना दिसून आल्याने हा प्रकार लक्षात आला आहे.दरम्यान अग्निशमन दलाचे जवानांकडून या मृतदेहाचा शेध सुरू आहेत.

जालना शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता.सहा) पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांच्या प्रवाहात वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी कुंडलिका नदी पत्रावरील जालना-रोहनवाडी मार्गावरील फारशी पुलावरून एक दुचाकीस्वार वाहून गेला होता.

त्यानंतर सोमवारी (ता.७) पुन्हा याच कुंडलिका नदी पत्रात एका पुरुषाचा मृतदेह वाहताना काही नागरिकांना दिसून आला. त्यानंतर या बाबत नागरिकांनी जिल्हा प्रशासनास माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने शोधकार्य सुरू केले आहे. अग्निशमन दलाने तीन पथके शहरातील रामतीर्थ पुलापासून ते जालना-रोहनवाडी मार्गावरील फारशी पुलापर्यंत शोधकार्य सुरू केले आहे. मात्र मृतदेह अद्याप सापडला नाही.

नेमका प्रकार काय?
हा व्यक्ती नेमका कुठे व कसा कुंडलिका नदीपत्रात पडला याची माहिती अद्याप प्रशासनाकडे उपलब्ध नाही. तसेच हा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय आहे? अशी चर्चा रंगू लागली आहे.


जुन्या भांडणाची कुरापत काढत दोन गटांत हाणामारी, दोघांचा मृत्यू
कळंब (जि.उस्मानाबाद) : दोन गटांत झालेल्या हाणामारीत तालुक्यातील देवधानोरा येथील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.सहा) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे. दरम्यान या हाणामारीत मृत्युमुखी पडलेल्या मृताचा मुलगा, पत्नी व अन्य एक असे तिघा जणांना गंभीर मार लागल्याने उस्मानाबादच्या शासकीय रुग्णलयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिराढोन येथील पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.


पोलिसानी दिलेल्या माहितीवरून मागील भांडणाची कुरापत काढुन मंगरूळ शिवारातील पारधी वस्तीवरील मोठा जमाव देवधानोरा शिवारात दाखल झाला. शेती व जुन्या भांडणाची कुरापत काढत या जमावाने देवधानोरा येथील पारधी समाजजातील लोकांना मारहाण करण्यास सुरवात केली. हातात काठ्या, कुऱ्हाडी व दगडाने मारहाण करण्यात आली. यात संतोष शिवाजी पवार (वय १८) व शिवाजी बिचवा पवार (वय ४५) यांचा जागीच मृत्य झाला.

त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा व अन्य एक असे तिघा जणांना गंभीर मार लागल्याने त्यांना उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश पाटील, येरमळा, शिराढोन येथील सहायक पोलिस निरीक्षक यांनी भेट देऊन आरोपीच्या शोधासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. मृत दोघांना येथील उपजिल्हा रुग्णलयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत शिराढोन येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

(संपादन - गणेश पिटेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com