एकाचा धारदार शस्त्राने खून

गुन्हा
गुन्हा

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः एका 38 वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्रोने खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. 23) दुपारी तालुक्‍यातील महालगाव शिवारात उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळाहून कुऱ्हाडीसह काठ्या हस्तगत केल्या आहेत. घरगुती वादातून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी वीरगाव पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.


संभा हरी जाधव (रा. महालगाव, ता.वैजापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. महालगाव शिवारातील भाऊसाहेब आढाव यांच्या शेतात सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास संभा जाधव यांचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह प्रथम त्यांच्या भावानेच बघितला. त्यांनी वीरगाव पोलिस ठाण्यात घटनेची माहिती कळविली. घटनेची माहिती मिळताच फौजदार अरविंद गटकुळ, ए. जी. नागटिळक, सहायक फौजदार हनुमान पालेपवाड, पोलिस नाईक बाबासाहेब धनुरे, पोलिस कॉन्स्टेबल दिनेश दांडगे, शिवनाथ सरोदे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संभा जाधव यांच्या डोक्‍यासह शरीराच्या इतर भागांवर तीक्ष्ण शस्त्रोने वार केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

घरगुती कारणावरून दोघा साडूंमध्ये वाद होऊन हा खून करण्यात आला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. संभा जाधव हे रविवारी (ता. 22) घरातून गेल्यानंतर ते परतले नाही. त्यामुळे ही हत्या रात्रीच्या सुमारास करण्यात आली असावी. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत वीरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com